मनोज तायडे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अमरावती उपजिल्हा प्रमुखपदी नियुक्ती
दर्यापूर प्रतिनिधी दिपक मेश्राम
अमरावती : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत पक्ष संघटना अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने मनोज तायडे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अमरावती उपजिल्हा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्तीनंतर मनोज तायडे यांच्यावर पक्ष संघटना मजबूत करणे, नव्या कार्यकर्त्यांना जोडणे तसेच पक्षाची भूमिका जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
नियुक्तीबद्दल पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मनोज तायडे यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी तायडे यांनी पक्ष नेतृत्वाने दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार मानत, मनसेची संघटना अधिक सक्षम करण्यासाठी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला

No comments:
Post a Comment