पोडसा गावामध्ये श्री हनुमानजींच्या प्राणप्रतिष्ठान निमित्त भव्य कलश यात्रा उत्साहात संपन्न



(प्रतिनिधी)अनुराग बुजाडे 

पोडसा (ता. गोंडपिपरी) : पोडसा गावामध्ये श्री हनुमानजींच्या प्राणप्रतिष्ठा महोत्सवानिमित्त भव्य कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले. या कलश यात्रेला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विशेषतः गावातील महिला भगिनींनी पारंपरिक वेशभूषेत मोठ्या श्रद्धा, भक्तीभाव आणि उत्साहाने सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

श्री हनुमानजी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त ७, ८ आणि ९ जुलै या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून वेदघोष, पूजाविधी, भजन-कीर्तन, महाआरती व महाप्रसाद आदी कार्यक्रम संपन्न होणार आहेत.

या मंगलमय सोहळ्यास संपूर्ण पोडसा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.


No comments:

Post a Comment