रुग्णसेवक श्रीधर पाटील कोल्हे यांना 'छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र गौरव सन्मान पुरस्कार २०२६' प्रदान



  प्रतिनिधी गजानन चव्हाण

मूर्तिजापूर, दि. ७ जुलै : रक्तदान व रुग्णसेवा क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कार्य करणारे जीवनज्योती ब्लड डोनर ग्रुपचे सदस्य व रुग्णसेवक श्रीधर पाटील कोल्हे (रा. दाताळा, ता. मूर्तिजापूर, जि. अकोला) यांना 'छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र गौरव सन्मान पुरस्कार २०२६' प्रदान करून गौरविण्यात आले.जागतिक रक्तदान दिनाचे औचित्य साधून अरिहंताण रक्त सारथी संस्थान यांच्या वतीने वारली समाज हॉल, आप्पा पाडा, गुरार गाव, मालाड (पूर्व), मुंबई येथे आयोजित भव्य गौरव सोहळ्यात हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. रक्तदान, रुग्णसेवा व समाजसेवा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या विविध व्यक्ती व संस्थांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

मूर्तिजापूर व अकोला परिसरातील गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध करून देणे, रक्तदात्यांचे जाळे उभे करणे, रुग्णांना आवश्यक ती मदत करणे तसेच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणे, या निस्वार्थ सेवाकार्याची दखल घेत श्रीधर पाटील कोल्हे यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.पुरस्कार स्वीकारल्यानंतर भावना व्यक्त करताना श्रीधर पाटील कोल्हे म्हणाले, "हा सन्मान केवळ माझा नसून रक्तदान व रुग्णसेवेसाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या प्रत्येक रक्तदाता, स्वयंसेवक आणि सहकाऱ्यांचा आहे. भविष्यातही मानवतेची सेवा अधिक जोमाने सुरू ठेवण्याचा माझा संकल्प आहे."

सोहळ्यात त्यांना सन्मानचिन्ह, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. या उल्लेखनीय यशानंतर मूर्तिजापूर व अकोला जिल्ह्यातील सामाजिक, रक्तदाता आणि रुग्णसेवा क्षेत्रातील कार्यकर्त्यांकडून श्रीधर पाटील कोल्हे तसेच जीवनज्योती ब्लड डोनर ग्रुपवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

No comments:

Post a Comment