दोन जिल्हाधिकाऱ्यांची 'हजारी मिल्क'ला भेट; आधुनिक दुग्धप्रक्रिया प्रकल्पाने वेधले लक्ष
महिला कर्मचाऱ्यांच्या कामगिरीची जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्याकडून विशेष दखल.
प्रतिनिधी गजानन चव्हाण
मूर्तिजापूर येथील हजारी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स या दुग्धप्रक्रिया प्रकल्पाने आपल्या आधुनिक तंत्रज्ञान, स्वच्छता आणि गुणवत्तापूर्ण उत्पादनामुळे अकोला व यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. अकोल्याच्या जिल्हाधिकारी वर्षा मीना आणि यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना यांनी प्रकल्पाला सदिच्छा भेट देत संपूर्ण उत्पादन प्रक्रियेची पाहणी केली. यावेळी मूर्तिजापूर मतदार संघांचे आमदार हरीशभाऊ पिंपळे व मूर्तिजापूर नगरपरिषदचे नगराध्यक्ष हर्षलभाऊ साबळे, जिल्हा दूध उदपादक संघांचे अध्यक्ष प्रशांतभाऊ हजारी यांनी दोन्ही जिल्हाधिकारी यांचे शॉल श्रीफळ देऊन स्वागत केले.
प्रकल्पाचे संचालक तथा जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष प्रशांत हजारी यांनी मान्यवरांना प्रकल्पाची माहिती दिली. दुधापासून तयार होणारे दही, पनीर, तूप, पॅकबंद दूध तसेच विविध दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती कशा पद्धतीने केली जाते, याची सविस्तर माहिती मान्यवरांना देण्यात आली.
पाहणीनंतर दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांनी प्लांटमधील अत्याधुनिक यंत्रसामग्री, काटेकोर गुणवत्ता नियंत्रण, स्वच्छतेचे निकष आणि शिस्तबद्ध व्यवस्थापनाचे भरभरून कौतुक केले. उत्पादन प्रक्रियेतील विविध विभागांची माहिती योगिता नवल यांनी प्रभावीपणे सादर केली.
यावेळी जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी विशेषतः महिला कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचे, समर्पणाचे आणि जबाबदारीने पार पाडत असलेल्या कार्याचे विशेष कौतुक केले. योगिता नवल यांच्या नेतृत्वक्षमतेची प्रशंसा करत त्यांचे योगदान इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.
या प्रसंगी भारत जेठवानी , अमोल प्रजापती, सुधीर दुबे, ज्ञानेश टाले, माधव, श्याम यांच्यासह प्रकल्पातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
दोन जिल्हाधिकाऱ्यांच्या या भेटीमुळे हजारी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सच्या गुणवत्तापूर्ण कार्याला आणि आधुनिक दुग्धप्रक्रिया व्यवस्थेला मोठी प्रशंसा मिळाल्याने परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

No comments:
Post a Comment