*फार्मर कप उपक्रमचा शुभारंभ कार्यक्रम संपन्न*



# अभिनेता अमीर खान व मा. मुख्यमंत्री यांचा शेतकऱ्यांशी थेट संवाद #

दर्यापूर प्रतिनिधी /दिपक मेश्राम 

दर्यापूर : आज दिनांक २९.०६.२०२६ रोजी सकाळी 10.00 वाजता  पानी फाऊंडेशन च्या सहकार्याने आयोजित ‘फार्मर कप २०२६’ चा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी कृषिमंत्री, पानी फाउंडेशनचे संस्थापक अभिनेते आमिर खान  यावेळी उपस्थित होते.  सदर कार्यक्रमाचे  तालुकास्तरीय प्रक्षेपण महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आले होते. यावेळी उद्घाटनास फार्मर कप उपक्रमात सहभागी झालेले पुरुष व महिला शेतकरी बचत गटातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी तालुका कृषी अधिकारी, दर्यापूर आरती साबळे यांनी उपस्थित शेतकरी गटाशी संवाद साधला. तालुक्यातील युवा पुरस्कार प्राप्त शेतकरी कुलदीप टोळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जीवन प्राधिकरणाच्या परिसरात एक वटवृक्षाचे महिलांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.  झूम लिंकद्वारे तालुक्यातील शेतकरी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.


'सत्यमेव जयते फार्मर कप २०२६' ही केवळ स्पर्धा नसून शेती परिवर्तनाची व्यापक जनचळवळ आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला आत्मविश्वास हेच त्याचे सर्वात मोठे यश आहे. आजचे शेतकरी गट पुढील काळात शेतकऱ्यांना एकत्र आणतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.


'सत्यमेव जयते फार्मर कप २०२६' या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला आत्मविश्वासच भविष्यातील कृषी परिवर्तनाचा पाया ठरेल. फार्मर कपमधील शेतकरी गट हे शेती क्रांतीचे शिल्पकार ठरणार आहेत, त्यांच्या अनुभवातून लाखो शेतकरी प्रेरणा घेतील. गटशेतीमुळे उत्पादन खर्च कमी होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मोठी मदत होणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी यांनी यावेळी सांगितले.


एकत्रितपणे शेती केल्यास आणि सामूहिक प्रयत्नातून शेतीचे नियोजन केल्यास उत्पादनवाढीसह शेतकऱ्यांचे उत्पन्नही निश्चितपणे वाढू शकते. जसा एक उत्तम शिक्षक विद्यार्थ्यांचे भविष्य घडवतो, त्याचप्रमाणे मार्गदर्शक शेतकरी गटांना योग्य दिशा देऊन त्यांच्या यशात मोलाची भूमिका बजावतील. हा उपक्रम डिजिटल आणि प्रत्यक्ष संपर्क यांचा प्रभावी संगम आहे. डिजिटल माध्यमातून अल्प खर्चात मोठ्या संख्येने लोकांपर्यंत पोहोचता येते, तर प्रत्यक्ष संवादातून विश्वास आणि आत्मियता निर्माण होते. या दोन्हींच्या एकत्रित वापरामुळे हा प्रयोग अधिक प्रभावी ठरणार असल्याचे अभिनेते आमिर खान यांनी यावेळी  सांगितले.


यावेळी तालुक्यातील शेतकरी गट, कृषि विभाग आणि उमेदचे मार्गदर्शक यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी थेट संवाद साधला. यावेळी सर्व कृषी अधिकारी, सर्व उपकृषी अधिकारी, सर्व मंडळ अधिकारी व कृषी विभाग आत्मा चे क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी उपस्थित  होते.


No comments:

Post a Comment