प्राण वाचवण्यासाठी धावून आला देवदूत; संजयभाऊ नाईक यांच्या प्रसंगावधानामुळे युवकाला मिळाले जीवनदान

 


प्रतिनिधी गजानन चव्हाण 

"माणुसकी अजून जिवंत आहे," याचा प्रत्यय देणारी घटना गुरवार सकाळी मूर्तिजापूर शहरातील चिखली गेट परिसरात घडली. सकाळी 8.30 ते 9.00 वाजण्याच्या सुमारास घराच्या बांधकामाचे काम सुरू असताना विजेचा भीषण शॉक लागून एक युवक गंभीर जखमी झाला. मृत्यूशी झुंज देत असलेल्या युवकासाठी वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुकाध्यक्ष संजयभाऊ नाईक हे अक्षरशः देवदूत ठरले.घटनेची माहिती मिळताच संजयभाऊ नाईक यांनी क्षणाचाही विलंब न करता ज्या अवस्थेत होते, त्याच अवस्थेत अंगात फक्त शांडो बनियान व बरमुमुंडा घातलेला असतांनी घटनास्थळी धाव घेतली. कोणतीही प्रसिद्धी किंवा औपचारिकतेचा विचार न करता त्यांनी गंभीर जखमी युवकाला स्वतःच्या वाहनातून अवघ्या तीन मिनिटांत उचलून श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय, मूर्तिजापूर येथे दाखल केले. त्यांच्या या तत्परतेमुळे एका युवकाला वेळेत उपचार मिळाले आणि त्याचे प्राण वाचण्यास मोठी मदत झाली.मिळालेल्या माहितीनुसार, आकाश पेंदोर (रा. सालतवाडा) हा युवक बांधकामावर काम करत असताना उच्चदाबाच्या वीजप्रवाहाचा जबरदस्त शॉक लागल्याने बेशुद्ध होऊन खाली कोसळला. त्याची प्रकृती अत्यंत गंभीर होती.रस्त्यावर वाहतुकीची कोंडी असतानाही संजयभाऊ नाईक यांनी धाडस आणि प्रसंगावधान दाखवत युवकाला तातडीने रुग्णालयात पोहोचविले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तात्काळ उपचार सुरू केल्याने युवकाची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. डॉक्टरांच्या मते, काही मिनिटांचा विलंब झाला असता तर मोठा अनर्थ घडू शकला असता.संकटकाळात स्वतःची पर्वा न करता दाखविलेली तत्परता, माणुसकी आणि सामाजिक बांधिलकी यामुळे संजयभाऊ नाईक यांच्या या कार्याचे शहरासह संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. "संकटात धावून आलेले देवदूत" अशी भावना नागरिक व्यक्त करत असून, जखमी युवक व त्याच्या कुटुंबीयांनीही संजयभाऊ नाईक यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.

No comments:

Post a Comment