बक्तरपूर येथे विशेष आधार शिबिर संपन्न.
पत्रकार:- मोहन जाधव
चास नळी:-बक्तरपूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात चास नळी उप पोस्ट ऑफिसच्या वतीने आयोजित करण्यात आलेले 'विशेष आधार शिबिर' आज मोठ्या उत्साहात आणि यशस्वीरित्या संपन्न झाले. या शिबिराला बक्तरपूर ग्रामस्थांनी मोठा आणि उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शासकीय कामांसाठी आधार कार्ड अद्ययावत असणे अत्यंत गरजेचे असल्याने, ग्रामीण भागातील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरादरम्यान अनेक नागरिकांनी नवीन आधार नोंदणी केली, तसेच अनेकांनी आपले फोटो, फिंगरप्रिंट आणि आयरिस (बायोमेट्रिक) अपडेट करून घेतले. याशिवाय आधार कार्डला मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी लिंक करणे, तसेच नाव, पत्ता आणि जन्मतारीख यातील चुका दुरुस्त करण्याच्या सेवा नागरिकांना एकाच ठिकाणी मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. याबरोबरच पोस्ट ऑफिस च्या वेगवेगळ्या योजना बाबत सविस्तर माहिती दिली. तसेच अशा प्रकारचे आधार शिबिर वेळोवेळी आयोजित करत राहावे अशी ग्रामस्थांनी मागणी केली. त्याचप्रमाणे हे शिबिर यशस्वी करण्यासाठी चास नळी उप पोस्ट ऑफिसचे पोस्टमास्तर संजय माळी आधार ऑपरेटर गवळी साहेब, तसेच पोस्ट ऑफिस चे कर्मचारी बाळासाहेब चांदगुडे, गोरक्षनाथ फटांगरे, शांताराम घुमरे, मोहन जाधव, गणेश रणधीर आणि बक्तरपूर ग्रामपंचायत कार्यालयाचे सरपंच, उपसरपंच तसेच ग्राम विकास अधिकारी, सदस्य आणि कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. ग्रामीण भागातच सर्व सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल बक्तरपूरच्या ग्रामस्थांनी चास नळी पोस्ट ऑफिस चे विशेष आभार मानले.

No comments:
Post a Comment