वडिलांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसा निमित्ताने पुत्राचा @75 ह्या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न

 


पत्रकार संभाजीराव सूर्यवंशी 

पिंपळगाव: असुसं प्रकाशन अंतर्गत कवी अविनाश लोंढे यांच्या @ 75 ह्या पहिल्या वहिल्या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा त्यांच्या वडिलांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मौजे बामणे येथे मोठ्या उत्साहात पार पडला. पुस्तकाचे प्रकाशन डॉ. जगताप, प्रा. संजय खोचारे व कवीचे वडिल श्री ईश्वर लोंढे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य रामकृष्ण मगदूम व स्वागत प्रास्ताविक सौ विद्या खामकर मॅडम यांनी केले.

                   या पुस्तकाचे नावीन्य म्हणजे कवी अविनाश लोंढे  यांचे वडील ईश्वर लोंढे यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने ७५ स्वलिखित कवितांचा  संग्रह, @७५ या नावाने छापून प्रकाशित करण्यात आला. कवी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की यातील ७५ पुस्तके ते शाळा,  कॉलेज, वाचनालय, ग्रंथालयाला मोफत देणार आहेत. उपस्थित सर्वांनीच या अनोख्या प्रकाशन सोहळ्यात आपली मनोगते व्यक्त केली.सदर कार्यक्रमाला तानाजी पावले, अशोक गुरव, बाळासो जाधव, किरण चव्हाण, सचिन दुधाळे, सुशांत बोटे, सौ पवार आधी मान्यवर उपस्थित होते.


No comments:

Post a Comment