अभिनव ग्रुप ऑफ एज्युकेशन, गडहिंग्लज: ज्ञान, संस्कार आणि गुणवत्तेचा दीपस्तंभ



पत्रकार संभाजीराव सूर्यवंशी 

"शिक्षण म्हणजे केवळ पदवी मिळविण्याचे साधन नव्हे; तर माणूस घडविण्याची अखंड साधना आहे." या विचाराला मूर्त स्वरूप देणारे नाव म्हणजे अभिनव ग्रुप ऑफ एज्युकेशन, गडहिंग्लज. अल्पावधीतच दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक तंत्रज्ञान, उत्कृष्ट निकाल आणि विद्यार्थीकेंद्री दृष्टिकोन यांच्या बळावर या संस्थेने पश्चिम महाराष्ट्रातील शिक्षणविश्वात विश्वासार्ह स्थान निर्माण केले आहे.

ज्ञानाच्या मंदिरात प्रवेश करणारा प्रत्येक विद्यार्थी हा केवळ विद्यार्थी नसतो; तो उद्याचा वैज्ञानिक, अभियंता, डॉक्टर, प्रशासकीय अधिकारी, उद्योजक किंवा जबाबदार नागरिक असतो. ही जाणीव मनात ठेवून अभिनव ग्रुप विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत आहे.


⭕ आधुनिकतेचा स्पर्श लाभलेला भव्य कॅम्पस -

अभिनवचा विस्तीर्ण आणि नयनरम्य कॅम्पस हा शिक्षणासाठी पोषक वातावरणाचा आदर्श नमुना आहे. प्रशस्त, हवेशीर व स्मार्ट वर्गखोल्या, अत्याधुनिक विज्ञान प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळा, समृद्ध ग्रंथालय, डिजिटल शिक्षण सुविधा, सुरक्षित परिसर आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक सोयी-सुविधांनी हा परिसर सुसज्ज आहे.

येथील प्रत्येक इमारत ज्ञानाचा दीप प्रज्वलित करते, प्रत्येक वर्ग विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देतो आणि प्रत्येक पाऊल उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल घडवते.

⭕ दूरदृष्टी लाभलेले व्हिजन-

अभिनव ग्रुपचे सर्वेसर्वा उच्चविद्याविभूषित डॉ. अमोल पाटील, संस्थेचे सचिव प्रा. संतोष पाटील, प्राचार्य अभिजित पाटील  आणि इतर संस्था पदाधिकारी यांच्या सक्षम आणि दूरदर्शी नेतृत्वाखाली संस्थेने अल्पावधीतच यशाचे शिखर गाठले आहे. अभिनव ग्रुपचे व्हिजन केवळ गुणवंत विद्यार्थी तयार करणे नाही; तर जागतिक स्तरावर सक्षम, चारित्र्यसंपन्न, वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले, सामाजिक जाणीव असलेले आणि राष्ट्रनिर्मितीत योगदान देणारे नागरिक घडविणे हे आहे.

"Think Big, Dream Big, Achieve Big" या ध्येयवाक्याला केंद्रस्थानी ठेवून प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये सुप्त क्षमता जागृत करण्याचे कार्य येथे सातत्याने सुरू असते.

⭕ ध्येय (Mission)- 

१. गुणवत्तापूर्ण आणि मूल्याधिष्ठित शिक्षण प्रदान करणे.

२. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना जागतिक स्पर्धेसाठी सक्षम बनविणे.

३. प्रत्येक विद्यार्थ्याच्या वैयक्तिक क्षमतेची ओळख करून तिचा सर्वांगीण विकास घडविणे.

४. ज्ञानाबरोबरच संस्कार, शिस्त, नेतृत्व आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करणे.

५. शिक्षणाला रोजगार, संशोधन आणि नवोपक्रमाशी जोडणे.

⭕ अभिनवची यशोगाथा : परिश्रमांचे सुवर्णपान -

अभिनव ग्रुपची खरी ओळख म्हणजे येथील विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षांमध्ये घवघवीत यश. दहावी, बारावी, जेईई, नीट, एमएचटी-सीईटी, फाउंडेशन आणि विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी सातत्याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

अनेक विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादीत झळकले असून वैद्यकीय, अभियांत्रिकी, फार्मसी, कृषी, पॅरामेडिकल आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळवून संस्थेचे नाव उज्ज्वल केले आहे.

⭕ उच्चांकी गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी खालीलप्रमाणे -

👉 रोहिणी नामदेव ठाणेकर NEET परीक्षेत देशात प्रथम क्रमांक, 

👉 अभिमान केसरकर (AIIMS) तसेच १० विद्यार्थी २०२५-२६ वर्षात शासकीय मेडिकल कॉलेजसाठी प्रवेशित झाले आहेत. 

त्याचबरोबर 

१. चिन्मय कुरबेटी (IIT मुंबई)

२. कुणाल गाड (IIT गुवाहाटी)

३. अथर्व पाटील (IIT हैदराबाद)

४. अंशुमन कंकणवाडी (IIT नागपुर)

५. हर्षवर्धन मटकर (IIT हैदराबाद)

६. आदित्य पाटील (NIT सिलचर)

७. अथर्व पाटील (NIT गोवा)

MHT-CET २०२६ मध्ये कुमारी सानिका इलगे ९९.९९%ile सह महाराष्ट्रात प्रथम क्रमांक


९९.५%ile + = २० विद्यार्थी

९९%ile + = ४० विद्यार्थी 

९८%ile + = ६७ विद्यार्थी

९५%ile + =१६० विद्यार्थी 


ही यशोगाथा केवळ आकड्यांची नाही; तर विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमांची, पालकांच्या विश्वासाची आणि विद्याव्यासंगी प्राध्यापकांच्या निष्ठेची आहे.

⭕ विद्यार्थीकेंद्री शिक्षणपद्धती -

अभिनवमध्ये प्रत्येक विद्यार्थी हा केंद्रबिंदू आहे. नियमित चाचण्या, वैयक्तिक मार्गदर्शन, शंका-निरसन सत्रे, पालक-शिक्षक संवाद, करिअर समुपदेशन, व्यक्तिमत्त्व विकास, प्रेरणादायी व्याख्याने आणि स्पर्धा परीक्षांसाठी विशेष प्रशिक्षण यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो.

⭕ ज्ञानासोबत संस्कारांची जोपासना -

संस्था विद्यार्थ्यांना केवळ बुद्धिमान नव्हे, तर संवेदनशील आणि जबाबदार नागरिक बनविण्यावर भर देते. राष्ट्रप्रेम, पर्यावरण संवर्धन, सामाजिक उत्तरदायित्व, नैतिक मूल्ये आणि मानवी संवेदना यांची रुजवात विविध उपक्रमांद्वारे केली जाते.

आज हजारो पालकांचा विश्वास आणि विद्यार्थ्यांची पहिली पसंती बनलेला अभिनव ग्रुप ऑफ एज्युकेशन हा शिक्षणातील उत्कृष्टतेचा नवा मानदंड ठरत आहे. बदलत्या काळाशी सुसंगत शिक्षण, अनुभवी शिक्षकवर्ग, आधुनिक सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या यशासाठी असलेली अखंड तळमळ यामुळे अभिनवची वाटचाल अधिकाधिक उंच शिखरांकडे सुरू आहे.

ज्ञान म्हणजे प्रकाश, संस्कार म्हणजे दिशा आणि परिश्रम म्हणजे यशाचा पाया. या त्रिसूत्रीवर उभारलेले अभिनव ग्रुप ऑफ एज्युकेशन, गडहिंग्लज हे केवळ एक शैक्षणिक संस्थान नाही, तर असंख्य विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना पंख देणारे प्रेरणास्थान आहे.

"जिथे पुस्तके पंख बनतात, विचारांना आकाश मिळते, स्वप्ने ध्येय बनतात आणि ध्येय यशात रूपांतरित होते तेच नाव म्हणजे अभिनव ग्रुप ऑफ एज्युकेशन, गडहिंग्लज."

विद्यार्थ्यांच्या मनावर संस्काराची पखरण 

पंखात बळ ज्ञानाचं, थिटे होईल गगन

अभिनय ग्रुप ही केवळ शिक्षणसंस्थाच नव्हे, 

ही तर गुणवंताची, प्रज्ञावंतांची आणि यशवंतांची खाण 

म्हणूनच आम्हा सर्वांना अभिनव ग्रुपचा सार्थ अभिमान

No comments:

Post a Comment