मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी (एलएलबी) यशस्वीरीत्या पूर्ण करून अॅड. राजकुमार साहेब यांचा वकिली क्षेत्रात प्रवेश



दर्पण इंदापूर तालुका प्रतिनिधी :-

23 जून रोजी इंदापूर येथील जंक्शन राजापूरे हॉटेलमध्ये वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष अॅड राजकुमार साहेब यांनी मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी (एलएलबी) पूर्ण केले कायद्याचे शिक्षण आता न्यायासाठी देणार योग्य दान, यांनी वकिली क्षेत्रात प्रवेश केला आहे.त्यांच्या या यशामुळे परिसरात अंदाजे वातावरण असून विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

कायद्याचे शिक्षण घेत असताना, त्यांनी कायदे व्यवस्था, गुन्हेगारी कायदे, मानवी हक्क तसेच सामाजिक न्याय विषयाचा सखोल अभ्यास केला. समाजातील सर्व समाज नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे ध्येय समोर ठेवून त्यांनी वकिली व्यवसायाची वाट निवडली त्यामुळे युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहेत. 

या कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडी इंदापूर तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

उपस्थितांनी यांना वकिलाचे अभिनंदन करत त्यांच्या उज्वल भविष्यात शुभेच्छा दिल्या समाजातील दुर्बल वंचित आणि गरजू घटकांना न्याय मिळवण्यासाठी त्यांनी सातत्याने कार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. कायद्याची पदवी प्राप्त करून समाजसेवेचा मार्ग स्वीकारणाऱ्या अँड राजकुमार साहेब यांच्या यशाबद्दल परिसरात कौतुकाचा वर्षाव होत, असून भविष्यात ते न्यायालयीन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून सामान्य जनतेचा विश्वास संपादन करतील असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी पुणे जिल्हा सचिव गोविंद कांबळे, विशाल सोनवणे, सिद्धार्थ साळवे, तेजस कांबळे, युवराज जाधव, विजय लोंढे, विनोद लोंढे ,छगन कांबळे ,रविकांत काळे, महेश भोसले ,संदीप साबळे , बबलू सोनवणे, राकेश शिंदे ,जनार्दन गोरे ,सागर चांदणे, सचिन उबाळे शाहीर साठे, बिरू माने आणि बाळू माने आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment