पत्रकारांना धमक्या देणाऱ्या खा. संजय दिना पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची पत्रकार संघाची मागणी

 



लासलगाव (प्रतिनिधी ) राज्यातील पत्रकारांवर दिवसेंदिवस हल्ले होत आहेत. तसेच आता तर लोकप्रतिनिधीही पत्रकारांना धमक्या देत आहेत. ही लोकशाहीच्या दृष्टीने गंभीर बाब आहे. शिवसेना (शिंदे गट) चे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांना त्यांना शिवीगाळ केली तसेच असभ्य भाषेत बोलून धमकी दिली आहे. हा प्रकार लोकशाहीला काळीमा फासणारा आहे. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर जर लोकप्रतिनिधीच जर अशा प्रकारे वागत असतील तर ही निंदनिय बाब आहे. खा. संजय दिना पाटील यांच्या प्रकारानंतर राज्यभरातील पत्रकारांमधून संतप्त प्रतिक्रीया उमटत असून या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करुन खा. संजय दिना पाटील यांच्यावर तात्काळ गुन्हा नोंदवून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघांचे संस्थापक जिल्हाध्यक्ष यशवंतराव पवार याच्या सूचनेनुसार निफाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांना देण्यात आले आहे.


     यावेळी  जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब बोरगुडे, निफाड तालुकाध्यक्ष  सागर निकाळे, उपध्यक्ष आशिफभाई पठाण, माणिक देसाई, राहुल कुलकर्णी, विनोद गायकवाड, रवींद्र जाधव,योगेश कर्डीले अमोल जाधव आदी उपस्तिथ होते


No comments:

Post a Comment