ईशान्य मुंबईचे वाचाळवीर खासदार संजय दिना पाटील यांचा टेंभुर्णीत निषेध. पत्रकारांना धमक्या दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी.



मराठी पत्रकार संघाच्या वतीने टेंभुर्णी पोलीसांना निवेदन सादर, राजीनाम्याचीही मागणी. 


टेंभुर्णी प्रतिनिधी विष्णु मगर

जाफ्राबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील मराठी पत्रकार संघाच्या वतीने ईशान्य मुंबईचे वाचाळवीर शिवसेना शिंदे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना धमक्या देऊन अश्लील भाषेत लोकशाहीचा अवमान केल्याप्रकरणी तीव्र निषेध नोंदवण्यात आला. तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करत टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश राठोड यांना निवेदन देण्यात आले.

टेंभुर्णी मराठी पत्रकार संघाची एक तातडीची बैठक संघटनेचे अध्यक्ष शेख साबेर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी खासदार संजय दिना पाटील यांनी पक्ष बदल केल्यानंतर मुंबईच्या पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, शासकीय अधिकारी व पोलीस अंगरक्षक यांच्यासमोरच पत्रकारांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून "जीवे मारण्याच्या धमक्या" दिल्याचा आरोप करण्यात आला.सत्ताधारी पक्षात राहून चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांना अशा प्रकारे धमकावणे हे लोकशाहीला काळीमा फासणारे कृत्य आहे. लोकप्रतिनिधीकडून अशी अपेक्षा नाही. असे संतप्त मत बैठकीत व्यक्त करण्यात आले.

या घटनेचा निषेध नोंदवून खासदार संजय दिना पाटील यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा व नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा, अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली. 

या निवेदनावर पत्रकार रावसाहेब अंभोरे, विष्णु मगर, प्रताप नवले, शेख साबेर, प्रल्हाद जाधव, बिडी सवडे, गजानन देठे, सुनील जोशी, सुनिल भाले, अशोक पाबळे, असपाक शेख, फकरु कुरेशी महमद बय्यास, नशिम शेख, अलकेश सोमाणी आदी च्या सह्य आहे.

No comments:

Post a Comment