'म्हसळा ग्रामीण रुग्णालयातील असुविधांबाबत शिवसेना आक्रमक
२६ जून २०२६. (वैभव कळस )
: लवकरात लवकर पद भरती नाही झाल्यास जन आंदोलनचा इशारा
म्हसळा ग्रामीण रुग्णालयात असुविधा व डॉक्टर यांची कमी बाबत शिवसेना शिंदे गट कमालीचा आक्रमक झाल्याचा आज दिसला.
रुग्णांना पिण्याचे पाणी नसल्याचे वास्तविक समोर येताच तालुका प्रमुख अमित महामुणकर व माजी तालुका प्रमुख प्रसाद बोर्ले आक्रमक झाले. या नंतर अमित महामुणकर यांनी प्रभारी अधीक्षक यांना फोन करून रुग्णांना तात्काळ पाण्याची व्यवस्था करा, रिक्त असलेले पदे भरती करून तज्ज्ञ डॉक्टर यांची नियुक्ती केली नाही तर जनआंदोलन करण्याचा इशारा दिला.यावेळी तालुक्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
सर्वात महत्वाचे म्हणजे म्हसळा ग्रामीण रुग्णालयात आलेले दोन शिकऊ डॉक्टर असून त्यांना मराठी बोलता येत नसल्याने गावाखेड्यातील रुग्णांचे हाल होताना दिसत आहे.

No comments:
Post a Comment