'शेतकरी सक्षम असणे गरजेचे नाम. आदिती तटकरे यांचे कृषी मेळाव्यात प्रतिपादन
२६ जून २०२६. (वैभव कळस )
जगाची प्रगती झपाट्याने होत असली तरी ज्याच्या जीवावर जग चालते तो शेतकरी सक्षम असणे हरजेचे असल्याचे प्रतिपादन म्हसळा तालुका कृषी मिळाव्याच्या उदघाटन प्रसंगी महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी केले. रायगड जिल्हा परिषद, कृषी विभाग पंचायत समिती म्हसळा आणि तालुका कृषी अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने न्यू इंग्लिश स्कूल म्हसळा येथे तालुका कृषी मेळाव्याचे आयोजन दि. २६ जून २०२६ रोजी करण्यात आले. सुरुवातीस आदिती तटकरे यांच्या हस्ते छ. शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.सर्वत्र वाढत्या औद्योकीकरणामुळे शेतकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे चिंतेचा विषय शासनाच्या ७५ टक्के सबसिडीच्या शेतकऱ्यांसाठी विविध योजना असून त्या योजनाचा शेतकऱ्यांनी पुरेपूर लाभ घेण्याचे आवाहन आदिती तटकरे यांनी केले.
कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून शेतकऱ्यांनी समृद्ध होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.कृषी मेळाव्यात काही बचत गटांनीच सहभाग घेतला होता. त्यापैकी अगरबत्ती बनविलेल्या स्टॉल ची प्रसंशा यावेळी त्यांनी केली. या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रा. जी. प. डॉ. रुपाली सातपुते, उपविभागीय अधिकारी महेश पाटील, तहसीलदार सचिन खाडे, जि. प. सदस्य अभिषेक विचारे, जि. सदस्य अनिल बसवत, सभापती बबन मनवे, उपसभापती लहुशेठ म्हात्रे,नगराध्यक्ष सुनिल शेडगे, उपनगराध्यक्षा श्रीम. जाधव,प. स. सदस्या प्रियांका निंबरे, प. स. सदस्या समृद्धी चाचले, तालुका अध्यक्ष समिर बनकर, मधुकर गायकर गटविकास अधिकारी राजू किरवे, कृषी अधिकारी विशाल जाधव, वि. अ. शिवदत्त परजणे, माजी नगराध्यक्ष संजय कर्णिक, दिलिप कांबळे,संतोष (नाना ) सावंत, किरण पालांडे आदि मान्यवर उपस्थित होते.

No comments:
Post a Comment