माऊंट एव्हरेस्ट स्कूलच्या दोन्ही शाखांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा


आंबेगाव बुद्रुक, पुणे : माऊंट एव्हरेस्ट स्कूलच्या ब्रांच १ व ब्रांच २ मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सामूहिक योगाभ्यास करून निरोगी जीवनाचा संदेश दिला.

कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे डायरेक्टर डॉ. सुशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध योगासने, प्राणायाम व ध्यानाचे प्रात्यक्षिक सादर केले. योगामुळे शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकास साधला जातो, तसेच तणावमुक्त जीवन जगण्यास मदत होते, याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमात मुख्याध्यापिका सुरेखा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली माधुरी डाळ, निकिता भोसले, स्वाती तिवाटणे, वृषाली तिखे, अमृता गोसावी, अश्विनी पाटोळे, अनिता पवार आणि संगीता धुमाळ यांनी सक्रिय सहभाग घेत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

दोन्ही शाखांतील सर्व विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी नियमित योगाभ्यास करून निरोगी जीवनशैली अंगीकारण्याचा संकल्प केला.


No comments:

Post a Comment