विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज , महारचिकना. येथे दीपावली सणानिमित्त आकाश कंदील बनवण्याची कार्यशाळा संपन्न.


प्रतिनिधी @ रामेश्वर तोंडे मेहकर

      आज दिनांक 2 नोव्हेंबर 2026 वार सोमवार ला विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, महारचिकना . येथे कागदापासून आकाश कंदील बनवण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेमध्ये इयत्ता पाचवी ते नववी पर्यंतचे विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या कार्यशाळेला मेहकर येथील सुप्रसिद्ध कलाशिक्षक श्री. रामेश्वर तोंडे सरांनी मार्गदर्शन केले. या मध्ये कागदापासून आकाश कंदील , पाण्याच्या बॉटल पासून आकाश दिवा, तेलाच्या कॅन पासून कचरा सुटली व बॉटल पासून भांडे घासण्याची वस्तू कशी तयार करतात ते पण टाकाऊ पासून टिकाऊ प्रशिक्षण विद्यार्थ्यांना व शिक्षकांना देण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक ,पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते .

यावेळी विद्यार्थ्यांनी सुद्धा या कार्यशाळेमध्ये अतिशय आनंदाने सहभाग घेतला .आज आपल्या विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, महारचिकना. येथील विद्यार्थ्यांना नवनवीन उपक्रम माती पासून गणपती बैल विविध कला कागदापासून आकाश कंदील बनवण्याची कला विद्यार्थ्यांना यावी व कागद काम यावे हाच नवीन शैक्षणिक धोरणानुसार किमान कौशल्याच्या आधारावर कार्यशाळा ठेवण्यात आली होती .हाच कार्यशाळेचा मुख्य उद्देश आहे.


No comments:

Post a Comment