हिंदू साम्राज्य दिनानिमित्त भव्य शिवराज्याभिषेक सोहळा; शिवचरित्राचा जागर


पुणे : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित हिंदू साम्राज्य दिन – शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात आणि शिवमय वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाला शिवप्रेमी नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. श्रीमंत श्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी राज्यव्यवस्थेचा आदर्श, राष्ट्रप्रेम आणि युवकांनी शिवविचार आत्मसात करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

प्रमुख शिवव्याख्याते प्रा. गजानन महाराज व्हावल गुरुजी यांनी ओजस्वी शिवव्याख्यानातून शिवचरित्रातील प्रेरणादायी प्रसंग उलगडून सांगत उपस्थितांना स्वराज्य, स्वाभिमान आणि संस्कारांचा संदेश दिला.

यावेळी श्रीकांत शिर्के यांनी सादर केलेल्या "कथा शिवरायांच्या पराक्रमाची" या प्रभावी शौर्यगाथेने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमात शिवचरित्र व धर्मग्रंथांचे पारायण करणाऱ्या पारायण वाचकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.याच्यामध्ये शिवचरित्र पारायण आणि शिवाप्रतिमा पूजन झालेल्या सोसायटी

1. राजगड व्हीला

2. चंद्रागण

3. वर्धमान

4. चव्हाण पॅरेडाईज

5. चिंतामणी विहार

6. कुटुंब सोसायटी

7. माऊंट एव्हरेस्ट स्कूल

8. यश करिअर अकॅडमी बाय डॉक्टर सुशांत शिंदे यांनी 10 दिवस वाचन केले.

या भव्य कार्यक्रमाचे आयोजन मा. बापूसाहेब चोरघे व मा. नगरसेविका सौ. प्रतिभा चोरघे , भगवान कोंढाळकर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन डॉ. सुशांत शिंदे यांनी केले. शेवटी सर्व उपस्थितांनी "जय भवानी, जय शिवाजी" आणि "हर हर महादेव"च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

No comments:

Post a Comment