Farmer ID अभावी कर्जमुक्तीचे KYC रखडले; मयत शेतकऱ्यांच्या वारसांना लाभासाठी ऑफलाइन मार्ग द्या

 



अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेतील पात्र लाभार्थ्यांचा प्रश्न; तहसीलदार-कृषी अधिकाऱ्यांनी उच्चस्तरीय पाठपुरावा करण्याची मागणी


मानोरा | प्रतिनिधी

  अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थी यादीत नाव असूनही काही मयत शेतकऱ्यांच्या वारसांना Farmer ID व ऑनलाइन KYCच्या तांत्रिक अडचणींमुळे लाभाच्या प्रक्रियेला मुकावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पात्र असूनही केवळ ऑनलाइन प्रणालीतील अडथळ्यांमुळे लाभापासून वंचित राहण्याची वेळ येऊ नये, अशी मागणी होत आहे.

मयत शेतकऱ्यांच्या नावावर Farmer ID उपलब्ध नसणे, वारसांच्या नावावर Farmer ID तयार नसणे, आधार प्रमाणीकरण तसेच अंगठ्याच्या ठशांशी संबंधित अडचणी यामुळे अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. अशा परिस्थितीत केवळ ऑनलाइन KYCची अट ठेवणे संबंधित वारसांसाठी अडथळा ठरत असल्याचे चित्र आहे.

या पार्श्वभूमीवर मयत शेतकऱ्यांच्या वारसांसाठी ठोस ऑफलाइन पर्यायी KYC प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जगदीश शामराव राठोड यांनी केली आहे. वारस नोंद, सातबारा, मृत्यू प्रमाणपत्र, आधार व इतर आवश्यक कागदपत्रांच्या आधारे सक्षम अधिकाऱ्यांकडून पडताळणी करून पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी केली.


                          समाजिक कार्यकर्ते

                       जगदीश शामराव राठोड 

No comments:

Post a Comment