'म्हसळा तालुक्यात अवघ्या ५५० मिमी पावसाची नोंद,संततधार पावसाला सुरुवात

 


२९ जून २०२६. (वैभव कळस )



दरवर्षी सरासरी साडेतीन ते चार हजार मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद होणाऱ्या म्हसळा तालुक्यात यंदा जून अखेरपर्यंत केवळ ५५० मिमी पावसाची नोंद झाली आहे.  २९ जून रोजी तालुक्यात एकाच दिवशी २४० मिमी मुसळधार पाऊस झाल्याने संततधार पावसाला अखेर सुरुवात झाली आहे.मागील वर्षी याच दिवशी तालुक्यात १७११ मिमी पावसाची नोंद झाली होती.तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे चित्र दिसून येत आहे. सन २०२५ मध्ये ७ मे रोजी पावसाचे आगमन झाले होते. 

त्यानंतर ३ नोव्हेंबरपर्यंत जवळपास सात महिने पाऊस सुरू राहून तब्बल ५९५३ मिमी इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली होती. तर सन २०२४ मध्ये ३९६१ मिमी पावसाची नोंद झाली होती.यावर्षी अल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे स्वरूप अनिश्चित राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे.त्यामुळे येत्या काळात पावसाचा जोर कसा राहतो याकडे शेतकरी व नागरिकांचे लक्ष लागले असून यंदाचा पावसाळा नेमका कसा ठरणार हे पुढील काही आठवड्यांतील पावसावर अवलंबून राहणार आहे.



No comments:

Post a Comment