नाईक अंतुले महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात संपन्न



२९ जून २०२६  (वैभव कळस )

म्हसळा: कोकण उन्नती मित्र मंडळ संचलित बॅरिस्टर ए. आर.  अंतुले संस्थापित वसंतराव नाईक कला वाणिज्य महाविद्यालय व बॅरिस्टर ए. आर. अंतुले विज्ञान महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस जोशपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या योग दिवसाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य दिगंबर टेकळे यांच्या हस्ते झाले. प्राचीन काळापासून योग महर्षी पतंजली यांनी योगाचे वरदान प्राप्त करून दिला आज संपूर्ण जगात योग दिवस साजरा करताना दिसून येत आहे. 

या प्रसंगी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सांस्कृतिक विभागातर्फे आयोजित केलेल्या या योग प्रात्यक्षिकात सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. रायप्पा माशाळे यांनी युवकांसाठी योगाचे महत्व सांगत अनेक प्रात्यक्षिक करून दाखविले. प्रामुख्याने ताडासन, वृक्षासन, पश्चिमोतासन , वक्रासन, गोमुखासन, वज्रासन, हलासन, सर्वांगासन, शीर्षासन इत्यादी आसनावर भाष्य करीत प्रात्यक्षिके करून विद्यार्थ्यांना प्रबोधन केले.


योग हा आंतरिक व बौद्धिक शक्ती प्रदान करणारी व तणावमुक्त जीवन बहाल करणारा माध्यम असल्याचे स्पष्ट नमूद कले. योग आरोग्यदायी दीर्घआयुष्य प्राप्त करून देणारा व्यायाम प्रकार आहे हे स्पष्ट केले. या योग दिनाचे सूत्रसंचालन प्रा. डाॅ. एस.  यू. बेंद्रे यांनी केले प्रास्ताविक व प्रात्यक्षिक प्रा.रायप्पा माशाळे यांनी केले. आभार प्रा. कानिफ भोसले यांनी मानले. तसेच प्रा. दुंडे, प्रा. डाॅ. सिद्दीकी, व बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन जोशपूर्ण वातावरणात संपन्न झाला.


No comments:

Post a Comment