दिवठाना ग्रामपंचायत मध्ये अंगणवाडी सेविका मदनस यांचं काम बंद आंदोलन सुरू



: प्रतिनिधी विनोद इंगळे

- कोरोना विषानुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत पातळीवर आशा वर्कर्स, अंगणवाडी सेवीका मदतनीस आणि अर्थवेळ स्त्रि परीचारीका परीचर यांनी केलेल्या कामाचा प्रोत्साहन भत्ता मिळावा   व कोरोणा विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर कोरोणा काळात अंगणवाडी सेवीका व मदतनीस, आशा वर्कर्स, गटप्रवर्तक आणि अर्धवेळ स्त्रि परीचारीका यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता लोकामध्ये आरोग्यविषयक जनजागृती, आरोग्याची काळजी घेणे महाआयुष सर्वे करणे, स्थलांतरीताचा सर्वे करणे, कोवीड १९ निगडीत सर्व कामे अहोरात्र मेहनत करुन केलीत. त्याची दखल जागतीक आरोग्य संघटना (WHO) ने सुध्दा घेतली. या केलेल्या कामाचा मोबदला आम्हाला मिळावा म्हणुन आमच्या (CITU) संघटनेच्या वतीने वेळोवेळी वरीष्ट पातळीवर आंदोलन करुन पाठपुरावा केला. 

त्याबाबत वरीष्टांनी सदर प्रोत्साहन भत्ता ग्राम पंचायतीने तातडीने दयावा अशे निर्देश दिलेले असुन सुब्दा त्याची अंमलबजावणी आपल्या ग्रामपंचायत कार्यालयाने केलेली नाही. आपणास आमची विनंती आहे की आपण ३० जुन पर्यत सदर कोरोना भत्ता अदा करावा, अन्यथा  5जुलै पासुन आपल्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील. करीता नोटीस देण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment