स्वातंत्र्यदिनानिमित्त पोडसा ग्रामपंचायतीतर्फे यंदा विधवा व स्त्री-सन्मानाचा अनोखा व प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला.



प्रतिनिधी अनुराग बुजाडे 

पोडसा, ता. गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : स्वातंत्र्यदिनानिमित्त पोडसा ग्रामपंचायतीतर्फे यंदा स्त्री-सन्मानाचा अनोखा व प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. ग्रामपंचायत कार्यालयातील ध्वजारोहणाचा मान आशा सुधाकर अलगमकार यांच्या हस्ते, तर पोडसा गावातील मुख्य चौकातील ध्वजारोहणाचा मान ताईबाई घनश्याम येलमुले यांच्या हस्ते पार पडला.

ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. देविदास पांडुरंग सातपुते यांच्या पुढाकारातून विधवा महिलांच्या हस्ते ध्वजारोहण करून त्यांना समाजात सन्मान, समानता आणि प्रतिष्ठेचे स्थान देण्याचा अभिनव संदेश देण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमातून ‘महिलांचा सन्मान हाच खऱ्या स्वातंत्र्याचा गौरव’ हा प्रेरणादायी संदेश समाजापर्यंत पोहोचला. पोडसा ग्रामपंचायतीच्या या स्त्री-सन्मानाच्या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले

No comments:

Post a Comment