ग्रामीण विद्यार्थिनीची शिष्यवृत्ती परीक्षेत दमदार कामगिरी

प्रतिनिधी : नामदेव सरोदे 

नेवासा तालुक्यातील नजिक चिंचोली येथील कु. आरती कृष्णा चावरे हिची उल्लेखनीय कामगिरी; ३०० पैकी २३४ गुणांसह ७८ टक्के

 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने एप्रिल २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ७ वी) मध्ये जि. प. प्रा. शाळा नजिक चिंचोली येथील विद्यार्थिनी कु. आरती कृष्णा चावरे हिने उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

कु. आरतीने ३०० पैकी २३४ गुण मिळवत ७८ टक्के गुण प्राप्त केले असून ती शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्र ठरली आहे. तिच्या या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

आरतीच्या या यशाबद्दल मुख्याध्यापक श्री. हरिभाऊ अरगडे, वर्गशिक्षक श्री. बळे सतीशकुमार, तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सरपंच, चेअरमन, ग्रामस्थ आणि सर्व शिक्षकवृंद यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले. तसेच तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही गुणवत्ता आणि जिद्द मोठ्या प्रमाणात आहे. योग्य मार्गदर्शन, शिक्षकांचे परिश्रम आणि विद्यार्थ्यांची मेहनत यामुळे ग्रामीण विद्यार्थीदेखील मोठे यश संपादन करू शकतात, हे आरतीच्या यशातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

“ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला योग्य दिशा मिळाली, तर यश निश्चित मिळते!”

कु. आरती कृष्णा चावरे हिच्या या उज्ज्वल यशाबद्दल जि. प. प्रा. शाळा नजिक चिंचोली परिवाराकडून हार्दिक अभिनंदन व पुढील शैक्षणिक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा! ग्रामीण विद्यार्थिनीची शिष्यवृत्ती परीक्षेत दमदार कामगिरी

कु. आरती कृष्णा चावरे हिची उल्लेखनीय कामगिरी; ३०० पैकी २३४ गुणांसह ७८ टक्के

नजिक चिंचोली, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने एप्रिल २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ७ वी) मध्ये जि. प. प्रा. शाळा नजिक चिंचोली येथील विद्यार्थिनी कु. आरती कृष्णा चावरे हिने उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

कु. आरतीने ३०० पैकी २३४ गुण मिळवत ७८ टक्के गुण प्राप्त केले असून ती शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्र ठरली आहे. तिच्या या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

आरतीच्या या यशाबद्दल मुख्याध्यापक श्री. हरिभाऊ अरगडे, वर्गशिक्षक श्री. बळे सतीशकुमार, तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सरपंच, चेअरमन, ग्रामस्थ आणि सर्व शिक्षकवृंद यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले. तसेच तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही गुणवत्ता आणि जिद्द मोठ्या प्रमाणात आहे. योग्य मार्गदर्शन, शिक्षकांचे परिश्रम आणि विद्यार्थ्यांची मेहनत यामुळे ग्रामीण विद्यार्थीदेखील मोठे यश संपादन करू शकतात, हे आरतीच्या यशातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

“ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला योग्य दिशा मिळाली, तर यश निश्चित मिळते!”

कु. आरती कृष्णा चावरे हिच्या या उज्ज्वल यशाबद्दल जि. प. प्रा. शाळा नजिक चिंचोली परिवाराकडून हार्दिक अभिनंदन व पुढील शैक्षणिक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा! तसेच उत्तीर्ण झालेले विद्यार्थी  आदिती शिवाजी चावरे, भक्ती नारायण धाडगे, आदित्य सिताराम जाधव,ज्ञानेश्वरी बाळासाहेब चौचुले, गौरी अरुण चांदणे, चैतन्य बंडू कदम, निलेश रामकिसन चावरे, दीक्षा राजेंद्र आदागळे, अजिंक्य सुभाष सोनपुरे, कल्याणी राहुल ठोंबरे,कल्याणी अमोल धाडगे, जयदीप भारत पाठक, कार्तिक दीपक आदागळे, सार्थक संतोष पाठक, प्रसाद नामदेव धाडगे, सौरभ गणेश चौचुले ,सिया सोपान पुंड,कार्तिकी एकनाथ गोंधळी, सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे हार्दिक अभिनंदन !

No comments:

Post a Comment