बुशरा अफसर कुरेशी सिरत क्वीझ स्पर्धेत तालुक्यातून सर्वप्रथम..



टेंभुर्णी प्रतिनिधी विष्णु मगर 

जमाते इस्लामी हिंद शाखा जाफराबाद यांच्या वतीने आयोजित जाफराबाद तालुका स्तरीय सिरत क्वीझ स्पर्धेचे आज जाफराबाद येथे बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जालन्याचे जमाते इस्लामी हिंद से बशीर अहमद आश्र्फी तर तर प्रमुख पाहुणे म्हणून जमाते इस्लामी हिंद शाखा जालनाच्या अम्मारा फिरदौस, व मरियम जमिला यांची विशेष उपस्थित होती.

 कार्यक्रमाची सुरुवात कुराणपटनाने झाली त्यानंतर नात व प्रेषित मोहम्मद यांच्या जीवनीवर विद्यार्थ्यांनी भाषणं केली. नंतर मान्यवर प्रमुख पाहुण्यांनी उपस्थितांचे मार्गदर्शन केले. 

 शेवटी आयोजित  स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. या स्पर्धेत दोन गट अ आणि ब तयार करण्यात आले होते. पाचवी ते आठवी ब गट नववी ते बारावी अ गट.

 ब गटातून इ बी के उर्दू स्कूलची विद्यार्थिनी बुशरा अफसर कुरेशी हिने तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळविला, दुसऱ्या क्रमांकावर नबीहा फातेमा बाखेर खान तर मोहम्मद उमर शेख रफिक याने तिसरा क्रमांक  पटकावला. तसेच गटामध्ये फारीया सलीम बामिद्र हिने प्रथम क्रमांक, महरीन फैजानोदिन सिद्दीकी हीने द्वितीय लाईबा फिरदोस तहसीब खान हिने तृतीय क्रमांक पटकावला दोन्ही गटातील विजेता विद्यार्थ्यांना रोख बक्षीस प्रमाणपत्र तसेच सन्मानचिन्ह देण्यात आले. याव्यतिरिक्त या स्पर्धेत चांगले गुण मिळवणाऱ्या दहा विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ बक्षीस दिले गेले यामध्ये अरीबा साबेरोद्दीन शेख, सबा रहेमान कुरेशी, अलीना अमर पठाण, फारीया अहमद अली कुरेशी, आयेशा शेख कलीम, निदा फातिमा सय्यद अश्रफ, सय्यद सालेहा महरीन,अहमद शेख अशपाक, हुमेरा मोहीब सिद्दिकी, उमेमा मुजीब खान, आमना आसीम शेख, जारा महेक हुसेन कुरेशी, जिकरा जुबेर खान, पठाण रोमाना रिजवान खान या विद्यार्थिनींचा सहभाग आहे. या स्पर्धेत जाफराबाद तालुक्यातील जी प उर्दू शाळा, आयेशा उर्दू शाळा, इ बी के उर्दू शाळा, फातिमा बी उर्दू शाळा, गुलशने मरियम उर्दू शाळा ह्या शाळेतील 300 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारूख सैफी यांनी केले तर आभार इमरान खान यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुमताज खान, सोहेल अहमद खान, ताहीर काजी, मोहम्मद खान आदींनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment