सातेफळ रोजगार सेवकाची तक्रार गटविकास अधिकारी साहेबांकडे तक्रार देऊन सुद्धा न्याय मिळत नाही.


प्रतिनिधी- गोकुळ गुरव 

सातेफळ येथील ग्राम रोजगार सेवक2018ते2025 शासनाने मंजूर केलेली घरकुल /विहीर/फळबाग लाभार्थ्यांचे एकही काम पूर्ण केले नाही तसेच अनेक मस्टर पैसे न दिल्या कारणाने झिरो मारण्यात आलेली आहेत.

2018 पासून लाभार्थी ग्रामपंचायतकडे दररोज चक्रा मारतात तरी बेमाफ  पैसे घेऊन देखील अरे रावी ची भाषा करतो गेल्या सात वर्षात एकही काम रोजगार सेवकांनी पूर्ण केलेले नाही तरी सातेफळ येथील नागरिकांनी गटविकास अधिकारी साहेबांकडे तक्रार देऊन देखील गट विकास अधिकारी साहेब व पंचायत समिती मधील इतर अधिकारी रोजगार सेवकाला पाठीशी घालत आहेत.

सातेफळ येथील नागरिकांना गट विकास अधिकारी साहेबांकडून न्याय कधी मिळणार. व ग्राम रोजगार सेवक बोलून दुसऱ्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात यावी. नाहीतर सातेफळ येथील नागरिकांकडून पंचायत समिती कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल.

No comments:

Post a Comment