शाळा गुणवत्ता मूल्यांकन (SQAAF) समिती
संभाजीराव सूर्यवंशी (महाड प्रतिनिधी)
शेख हुसेन काझी इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा शाळा गुणवत्ता मूल्यांकन समितीचा दौरा संपन्न
महाड : शेख हुसेन काझी इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे शाळा गुणवत्ता मूल्यांकन समितीची (SQAAF) औपचारिक भेट पार पडली. सुधीर भास्कर सकपाळ, विस्तार अधिकारी (शिक्षण) व पथक प्रमुख यांच्या नेतृत्वाखालील चार सदस्यीय समितीत वैभव बबन कांबळे (केंद्र प्रमुख), रघुनाथ रामदास वन्नेरे (मुख्याध्यापक) आणि शिवाजी अर्जुन यादव (तंत्रस्नेही शिक्षक) यांचा समावेश होता.
समितीने शाळेच्या पायाभूत सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता, अध्यापन पद्धती, शिस्त, उपक्रमशीलता आदी सर्व घटकांचे सखोल निरीक्षण केले. प्रत्येक वर्गात प्रत्यक्ष भेट देत पाठ निरीक्षण करण्यात आले तसेच १२८ मानकांनुसार सादर केलेल्या पुराव्यांची तपासणी करण्यात आली.
समितीने शाळेचे प्रशासन, व्यवस्थापन आणि शैक्षणिक कामकाज समाधानकारक आणि उत्तम असल्याचे नमूद केले. सुधीर सकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली समितीने संस्थेचे अध्यक्ष वजीर कोंडीवकर, सचिव असफ पल्लवकर, प्राचार्य संभाजीराव सूर्यवंशी, मुख्याध्यापिका वर्षा मालुसरे आणि सर्व शिक्षक-कर्मचारी यांच्या कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
शाळा व्यवस्थापन आणि स्टाफच्या संयुक्त प्रयत्नांमुळे शैक्षणिक गुणवत्तेत सातत्याने होत असलेली प्रगती अधोरेखित झाल्याचे समितीने विशेषत्वाने नमूद केले.

No comments:
Post a Comment