मूर्तिजापूर बसस्थानक येथे लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन.

 


प्रतिनिधी गजानन चव्हाण 

 दि. 18 जुलै 2026 (शनिवार)

लोकशाहीर साहित्यसम्राट डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मूर्तिजापूर बसस्थानक परिसरात अभिवादन व  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळत त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमात डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक, साहित्यिक आणि परिवर्तनवादी कार्याचा गौरव करण्यात आला. त्यांच्या विचारांचा समाजाने आदर्श घ्यावा, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर, समाजबांधव व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांमध्ये गोपाल पवार, सुरेश थाटे, महेश वाडेकर, अभिजीत देशमुख, आदेश महाजन, रवींद्र गेटे, निलेश खडसे, किशोर भगत, लखन खडसे, मनीष बाजड, शंकर थाटे, गोडाले, वाकोडे मंगरूळ कांबे, सावळे,नकुल खडसे,  यांच्यासह अनेक समाजबांधव उपस्थित होते.कार्यक्रम शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

No comments:

Post a Comment