मूर्तिजापूरमध्ये अपहरण झालेल्या दोन अल्पवयीन मुलांचा अवघ्या काही तासांत शोध
प्रतिनिधी गजानन चव्हाण
पोलीस बाईज संघटना वमूर्तिजापूर शहर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
मूर्तिजापूर शहरातील गजानन नगर परिसरातून बेपत्ता झालेल्या दोन अल्पवयीन मुलांचा अखेर सुखरूप शोध लागला असून, पोलीस बाईज संघटना आणि मूर्तिजापूर शहर पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे ही कारवाई यशस्वी ठरली.
मिळालेल्या माहितीनुसार, गजानन नगर येथील रहिवासी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून तिचा १३ वर्षीय मुलगा अक्षय गझलवार आणि त्याचा १३ वर्षीय मित्र आकाश लाल नंदा हे २ जुलै रोजी सकाळी सुमारे ६ वाजता घराबाहेर गेल्यानंतर परत न आल्याने मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र पोलीस बाईज संघटना मूर्तिजापूर चे अध्यक्ष. संदीप हरिदास घाटे .यांच्या नेतृत्वाखाली विविध शोध पथके तयार करण्यात आली. संघटनेच्या सदस्यांनी विविध ठिकाणी शोधमोहीम राबवित अखेर दोन्ही मुले अमरावती रेल्वे स्थानकावर सुखरूप आढळून आली.
यानंतर मुलांना तातडीने मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पोलीस निरीक्षक धर्मेंद्र जोशी , पोलीस उपनिरीक्षक राजू वानखडे, हेड कॉन्स्टेबल इरफान, महिला पोलीस कॉन्स्टेबल उजमा,रेशमा यांच्या उपस्थितीत दोन्ही मुलांना त्यांच्या आई-वडिलांच्या ताब्यात सुरक्षितपणे सुपूर्द करण्यात आले.
या शोधमोहिमेत शुभम जयस्वाल, प्रेम संजय बैतुले, प्रवीण वानखडे, अतुल गावंडे, आशू भेले , वैभव वानखेडे, साहिल वाघमारे, धीरज धाबाले, लकी थाटे, मानव दहातोंडे, पर्वेश गजलवर, आतिश ईगले, आशिष वानखडे, यश बैतुले आणि आदेश ईगले यांनी मोलाचे परिश्रम घेतले.या उल्लेखनीय कार्याबद्दल.
मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार धर्मेंद्र जोशी यांनी पोलीस बाईज संघटनेच्या सदस्यांचा सत्कार करून त्यांच्या तत्परतेचे आणि सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले.या घटनेमुळे पोलीस आणि सामाजिक संघटनांच्या समन्वयातून संकटाच्या काळात नागरिकांना तातडीची मदत कशी मिळू शकते, याचे उत्तम उदाहरण समोर आले आहे.

No comments:
Post a Comment