टेंभुर्णीत देशी दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्यास अटक, 64,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त .
पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब खार्डे यांची कारवाई, होंडा शाईन सह देशी दारूच्या 72 बाटल्या
टेंभुर्णी प्रतिनिधी
टेंभुर्णी पोलीस स्टेशन हद्दीत देशी दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्या इसमास पोलिसांनी सापळा रचून अटक केली. या कारवाईत पोलिसांनी 64,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या विषयी अधिक माहिती अशी की, टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब शिवाजी खार्ड हे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या आदेशाने अवैध धंद्यावर केसेस करण्यासाठी ते पथकासह पेट्रोलिंग करत होते.
यावेळी गुप्त बातमीदारामार्फत त्यांना माहिती मिळाली की, परमेश्वर कुंडलीकराव जाधव, वय 56, रा. हिवरा काबली, ता. जाफ्राबाद हा इसम लाल रंगाच्या होंडा शाईन मोटारसायकल क्रमांक MH 21 BB 7547 वरून देशी दारूची चोरटी वाहतूक करून जाफ्राबाद येथून नळविहीरा मार्गे हिवराकाबली गावाकडे जाणार आहे.
या मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून पोलिसांनी दोन पंचांना पाचारण करून मौजे नळविहीरा गावाजवळ गणेश तुकाराम जंजाळ यांच्या शेताजवळ रोडच्या बाजूला दबा धरून बसले. सकाळी 11.50 वाजता बातमीदाराने सांगितल्याप्रमाणे सदर लाल रंगाची होंडा शाईन येत असताना पोलीस पथकाने तिला थांबवले. व वाहन चालकाकडे विचारणा केली असता, त्याचे नाव परमेश्वर कुंडलीकराव जाधव असे सांगितले. पोलिसांनी पंचासमक्ष वाहनाची झडती घेतली असता, पीशवीमध्ये व मोटारसायकलच्या डिक्कीमध्ये देशी दारूचा साठा आढळून आला.त्यामध्ये 2400 रु. किमतीच्या काळ्या रंगाच्या कपड्याच्या पीशवीत देशी दारू "सखु संत्रा टॅंगो प्रीमियम" असे लेबल असलेल्या 180 ML च्या 24 काचेच्या बाटल्या, प्रत्येकी 100 रु. दराने.
2400 रु. किमतीच्या लाल रंगाच्या नॉयलॉनच्या पीशवीत देशी दारू "सखु संत्रा टॅंगो प्रीमियम" असे लेबल असलेल्या 90 ML च्या 48 बाटल्या, प्रत्येकी 50 रु. दराने.3. 60,000 रु अंदाजे किमतीची होंडा कंपनीची लाल रंगाची शाईन, क्रमांक MH 21 BB 7547.असा एकूण 64,800 रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सदर देशी दारू मुद्देमालापैकी एक 180 ML व एक 90 ML ची बाटल सी.ए. सॅम्पल तपासणीकामी वेगळी काढून उर्वरित माल पंचासमक्ष जप्त करण्यात आला.
आरोपी परमेश्वर कुंडलीकराव जाधव याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 अ व ई अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब खार्डे करीत आहेत. या कारवाईत पो.कॉ. कायंदे, सागर शिवरकर, होमगार्ड आढावे , कुमकर यांनी सहभाग घेतला.

No comments:
Post a Comment