म्हसळा हिंदू समाज अध्यक्ष नंदू गोविलकर यांना मातृशोक




२८ जून २०२६. (वैभव कळस )

म्हसळा हिंदू समाज अध्यक्ष नंदकुमार वसंत गोविलकर यांच्या मातोश्री कै. सुनंदा वसंत गोविलकर यांचे त्यांच्या रहात्या घरी वयाच्या ८७ व्या वर्षी वृद्धापकाळाने आज २८ जून रोजी दुःखद निधन झाले. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या कै. सुनंदा वसंत गोविलकर यांच्या पश्चात तीन मुले, सुना आणि नातवंडे, पतवांडे असा फार मोठा परिवार आहे. त्यांच्या दुःखद निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण म्हसळा तालुक्यात शोक व्यक्त करण्यात आला. 

श्रीवर्धन -म्हसळा तालुक्यातील सर्व जाती धर्माचे, सर्व पक्षांचे कार्यकर्ते यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन कै. सुनंदा गोविलकर यांचे अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. सायंकाळी ५ वा. म्हसळा हिंदू स्मशान भूमीत त्यांच्यावर अंतिम  संस्कार करण्यात आले.

No comments:

Post a Comment