फेरीवाले यांच्या विविध मागण्यांसाठी ५ ऑगस्टला मनपा मुख्यालयावर बेमुदत निर्णायक आंदोलनाची हाक



दर्पण जिल्हा प्रतिनिधी संतोष ठाकरे

फेरीवाले बचाव संघर्ष समितीने महापालिका प्रशासनाला ठणकाऊन सांगितले आहे की, त्यांच्या विविध मागण्यांकडे मनपा गंभीरपणे न येईपर्यंत ते ५ ऑगस्टपासून मनपा मुख्यालयासमोर बेमुदत, निर्णायक आंदोलन सुरु करतील. आज  समितीचे प्रतिनिधी मनपा आयुक्त प्रुथ्वीराज साहेब आणि उपमहापौर मार्शल लोपीस यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

बैठकीदरम्यान समितीने फेरीवाले वर्गाला भेडसावणाऱ्या महत्वाच्या मुद्द्यांबाबत पूर्ण माहिती देत, त्वरित आणि ठोस निर्णय आढळून आणण्याची मागणी केली. समितीच्या भेटीत अध्यक्ष रुपाली पवार,  सचिव काॅ शेरू वाघ, उपाध्यक्ष श्रीराज घोणे, सौ. संजना सिंग, खजिनदार, आकाश गुप्ता आणि सदस्य इम्रान सिधिकी उपस्थित होते. प्रतिनिधींनी आयुक्त व उपमहापौर यांच्या समोर त्यांच्या मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर केले आणि ५ ऑगस्टपर्यंत न्याय्य तो प्रतिसाद मिळाला नाही तर ते मनपा मुख्यालयासमोर उग्र आंदोलनाला सुरुवात करणार असल्याची आगाऊ सूचना दिली.

समितीकडून अधोरेखित केलेले मुख्य मुद्दे:

- फेरीवाले व्यवसायाच्या सुरक्षेसाठी ठरवलेली धोरणे आणि परवानगीची सुनिश्चिती.

- व्यावसायिक व परिसरातील अडथळे कमी करण्यासाठी स्थानिक नियोजनात सहभागी करून घेणे.

- नवीन फेरीवाले चा तातडीने सर्वे करणे

- फेरीवाल्यांवर मारहाण करुन हल्ला करणारे विरुद्ध तातडीने कारवाई करणे

उपमहापौर आणी आयुक्त ह्यांनी आश्वासन दिले आहे की, मनपा प्रशासनाने लवकरात लवकर बैठकीची तारीख निश्चित कर आणि समितीच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देत लवकरच सयुक्त बैठक बोलवीण्याचे दिले आहे ; बैठकीत मार्ग निघाला नाही तर अन्यथा ५ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या बेमुदत आंदोलनाची जबाबदारी प्रशासनावर राहील.

असा इशारा अध्यक्ष रुपाली पवार यांनी दिला आहे

No comments:

Post a Comment