मराठा समाज उन्नती मंडळ, आयुध निर्माणी वरणगावची नूतन कार्यकारिणी जाहीर


   


 प्रतिनिधी- गोपाळकुमार कळसकर

भुसावळ : आयुध निर्माणी वरणगाव येथे सकल मराठा समाज उन्नती मंडळाची वार्षिक  सभा नुकतीच पार पडली .सन २०२६  -  २०२७ वर्षातील  विविध समाजपयोगी उपक्रम राबविण्यासाठी मराठा समाज उन्नती मंडळाच्या नवीन पदाधिकाऱ्यांची सर्व सदस्यानुमते निवड करण्यात आली. यावेळी मराठा समाज उन्नती मंडळ अध्यक्षपदी यशवंत पाटील, सचिवपदी विकास पाटील, तर खजिनदारपदी अशोक पाटील यांची निवड करण्यात आली. मंडळातर्फे परिसरात  कित्येक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. 

छत्रपती शिवजन्मोत्सव, राजमाता जिजाऊ जन्मोत्सव विविध महापुरुषांच्या जयंत्या, महिला सक्षमीकरण, विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान स्पर्धा, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी, मॅरेथॉन, रक्तदान शिबिर, प्रबोधनपर व्याख्यान, मार्गदर्शन शिबिर, वृक्षारोपण  इ.कार्यक्रम आजपावेतो मंडळाने उत्कृष्टरित्या राबवले आहेत.नुकत्याच पार पडलेल्या शिवजन्मोत्सव सोहळ्यात आज निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांनी विशेष सहकार्य केले. आमच्यावर सोपवलेली जबाबदारी ही समाजाचे ऋण फेडण्याची अनमोल संधी आहे ,आम्ही नक्कीच आपल्या जबाबदारी व विश्वासाला पात्र ठरू व समाजहितासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करू असे आश्वासन यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी दिले. यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना   उपस्थितांतर्फे शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी  सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment