लवकरच जत लिंगायत समाज दफनभूमीचे रुपडे पालटणार :विक्रम ताड यांची ग्वाही.
प्रतिनिधी : मोहसीन इनामदार
जत येथील लिंगायत समाज दफनभूमीची दुरावस्था झाल्याने या दफनभूमीकडे लक्ष देण्यात यावे व दफनभूमीची सुधारणा करण्यात यावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते श्री. चंद्रकांत उर्फ पापा कुंभार यांनी जत नगरपरिषदेचे नगराध्यक्ष डॉ. रविंद्र आरळी व उपनगराध्यक्ष विक्रम ताड यांची भेट घेऊन त्यांच्याशी लिंगायत समाज दफनभूमी दुरावास्थेसंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. जत येथील सामाजिक कार्यकर्ते व लिंगायत समाजाचे नेते श्री.चंद्रकांत उर्फ पापा कुंभार यांनी लिंगायत समाज दफनभूमी संदर्भात जत नगरपरिषदेणे लक्ष द्यावे अशी मागणी केली होती.
त्यानंतर जत नगरपरिषदेचे डॅशिंग उपनगराध्यक्ष श्री.विक्रम ताड यांनी जत नगरपरिषदेचे बांधकाम सभापती श्री. मिथुन भिसे, स्वछता व आरोग्य सभापती श्री. गौतम ऐवळे,नगरसेवक श्री. परशुराम मोरे, कुमार साळे, गोपाल पाथरूट, नगरपरिषद अभियंता,भा. ज. पा. जत शहराध्यक्ष श्री. आण्णा भिसे,डॉ . प्रवीण वाघमोडे ,श्री. चंद्रकांत उर्फ पापा कुंभार आदींनी पाहणी केली. यावेळी उपनगराध्यक्ष विक्रम ताड यांनी लिंगायत दफनभूमीचा आढावा घेतला. या ठिकाणी हायमास्ट पोल उभे करणे, अंतर्गत रस्ता तयार करणे, बंद असलेली बोर चालू करून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, या ठिकाणी संपूर्ण स्वछता करणे, त्याच प्रमाणे दोन खोल्याचे बांधकाम करून यात बाथरूम व शोचालयाची व्यवस्था करणे.
आदी कामे लवकरात लवकर करण्यात येणार असून लवकरच लिंगायत समाज दफनभूमी जागेचा प्रश्नही मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन ही ताड यांनी दिले. उपनगराध्यक्ष विक्रम ताड यांनी तातडीने लिंगायत समाज दफनभूमी प्रश्नाकडे लक्ष दिल्याने लिंगायत समाज बांधवांकडून विक्रम ताड व त्यांच्या सहकार्याचे आभार व्यक्त करण्यात येत आहे.

No comments:
Post a Comment