अ, ब, क, ड उपवर्गीकरणाविरोधात महागावात आंबेडकर अनुयायांची बैठक संपन्न
महागाव प्रतिनिधी / अक्षय डोंगरे
महागाव, दि. २५ जुलै : अनुसूचित जातींच्या अ, ब, क, ड उपवर्गीकरणाच्या पार्श्वभूमीवर महागाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात शनिवारी (दि. २५ जुलै) आंबेडकर अनुयायांची बैठक उत्साहात पार पडली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी परसराम कांबळे होते, तर हरिभाऊ मोरे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी प्रा. शरदचंद्र डोंगरे यांनी उपवर्गीकरणाच्या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करत संविधानिक हक्कांचे संरक्षण करण्यासाठी समाजाने संघटित राहण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपवर्गीकरणाच्या विषयावर चर्चा करण्यात आली. उपस्थितांनी समाजात ऐक्य कायम ठेवत घटनात्मक व लोकशाही मार्गाने पुढील लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त केला.
बैठकीस महागाव परिसरातील समस्त आंबेडकर अनुयायी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment