मुंबई-अहमदाबाद महामार्ग ठ्प्पः ४० किमीच्या रांगा पावसाचा तडाखा दमणगंगा नदीवरील पूल पाण्याखाली, प्रवाशांचे मोठे हाल



दर्पण जिल्हा प्रतिनिधी संतोष ठाकरे

दक्षिण गुजरातमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई- अहमदाबाद राष्ट्रय महामार्ग (NH-48) गुरुवार शुक्रवार तब्बल सहा तासाहून अधिक काळठप्पझाला.वापी येथील दमनगंगा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद केली. परिणामी मुंबइकडून गुजरातकडे तसेच गुजरातकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली अस्रन, दोन्ही बाजूंना सूमारे ४० ते ५० किलोमीटरपर्यत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत

STTRINSLOGISTICSPVT.L CIOIPUST wipstresconअसल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली.

आणि महामार्गावरील सखल भागातील पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला. महामार्ग बंद झाल्याने वापी, भिलाड, तलासरी आच्छाड आणि मनोरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.या कोंडीत हजारो मालवाहू ट्रक, आंतरराज्यीय खासगी बसतसेचशेकडो खासगी वाहने अडकून पडली आहेत. सहा ते सात तासांहून अधिक काळ वाहतूक ठप्प असल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.पिण्याचे पाणी, अन्नपदार्थ आणि इतर अत्यावश्यक सुविधाचा तुटवडा

जाणवत असून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना विशेषतः अडचर्णचा सामना करावा लागत आहे परिस्थितीवर ' नियंत्रण ठेवण्यासाठी गुजरात आणि महाराष्ट्र पोलिसांसह आपत्ती व्यवस्थापनाची पथके घटनास्थळी तैनात करण्यात आली आहेत. दमनगंगा नदीची पाणीपातळी हळूहळू ओसरत असली, तरी पूल पूर्णपणे पाण्याबाहेर येऊन त्याची सुरक्षिता तपासल्यानंतरच महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार

दरम्यान, प्रशासनाने वाहनचालकांना सध्या मुंबई- अहमदाबाद महामार्गावरून प्रवास टाळण्याचे आवाहन केले असून, अत्यावश्यक प्रवासासाठी स्थानिक अंतर्गत रस्ते किंवा बालीथा-गरनाला मागाचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. परिस्थिती सामान्य होण्यासाठी आणखी काही तास लागू शकतात अशी शक्यता वर्तविण्यात येत आहै

गेल्या २४ तासांपासून वलसाड वापी आणि परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यातच वरच्या भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे मधुबन धरणाचे दरवाजे उघडून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला त्यामुळे दमनगंगा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली

No comments:

Post a Comment