अकोला होमगार्ड दलाचा मूर्तिजापूर होमगार्ड पथकाचा राहुल तोडकर "आपात सहायता" विशेष प्रशिक्षणात महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक राज्यस्तरीय कामगीरी.
प्रतिनिधी गजानन चव्हाण
मध्यवर्ती प्रशिक्षण केंद्र, मुंबई (घाटकोपर) येथे दि. ८ जुलै ते २१ जुलै २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या "आपात सहायता" विशेष प्रशिक्षण पाठ्यक्रमात अकोला जिल्हा होमगार्ड दलाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या प्रशिक्षणात अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर सैनिक पथकाचे पलटण नायक राहुल तोडकर यांनी उत्कृष्ट कामगिरी करत संपूर्ण महाराष्ट्रात अकोला जिल्ह्याला द्वितीय क्रमांक मिळवून दिला.
या राज्यस्तरीय प्रशिक्षणाचा पाठ्यक्रम क्रमांक 1101 असून, त्यामध्ये प्रथम क्रमांक सातारा जिल्हा , द्वितीय क्रमांक अकोला जिल्हा आणि तृतीय क्रमांक वर्धा जिल्ह्याने पटकावला. या यशामुळे अकोला जिल्हा होमगार्ड दलासह मूर्तिजापूर सैनिक पथकाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
पलटण नायक राहुल तोडकर यांनी प्रशिक्षणादरम्यान दाखविलेली शिस्त, मेहनत, कर्तव्यनिष्ठा, नेतृत्वगुण आणि आपत्कालीन परिस्थितीत कार्य करण्याची क्षमता यामुळे अकोला जिल्ह्याला ही मानाची कामगिरी प्राप्त झाली. त्यांच्या या यशाबद्दल होमगार्ड दलासह सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.तो आपल्या यशाचे श्रेय आपले आई वडील व अकोला जिल्हा समादेशक तथा अपर जिल्हा अधीक्षक चंद्रकांत रेड्डी तसेच अकोला जिल्हा कार्यालयाचे केंद्र नायक पोहरे,डोंगरे आसोलकर, आघाव, देशमुख, व मूर्तिजापूर पथकाचे प्र.समादेशक अधी Adv. दिलीप नाईक, पलटणनायक, संतोष महल्ले, महादेव नेमाडे, कंपनी सार्जेंट मेजर गजानन चव्हाण, सार्जेंट अमोल सिरसाट, अक्षय चिकणे व संपूर्ण मूर्तिजापूर सैनिक पथकातील महिला पुरुष अधिकारी व जवानांना देत आहे,
याप्रसंगी विविध सामाजिक, प्रशासकीय व होमगार्ड क्षेत्रातील मान्यवरांनी राहुल तोडकर यांचे अभिनंदन करत, त्यांच्या पुढील सेवाकार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. त्यांनी भविष्यातही अशाच उत्कृष्ट कामगिरीद्वारे अकोला जिल्ह्याचे नाव राज्यभर उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

No comments:
Post a Comment