म्हसळा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी उप मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याकडून १ कोटी ७५ लाखाचा निधी मंजूर '.
(म्हसळा बातमीदार )
म्हसळा नगरपंचायत हद्दीतील विविध विकासकामे व्हावी यासाठी शिवसेना नगरसेवकांनी नामदार भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वा खाली राज्याचे उप मुख्यमंत्री यांची भेट घेतली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी म्हसळा शहरातील सर्व नगरसेवकांना लवकरच विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल अशी ग्वाही दिली होती.
१३ जुलै रोजी नगरविकास खात्या मार्फत म्हसळा शहरातील विकास कामांचे परिपत्रक काढण्यात आले असून यामध्ये नगरपरिषद यांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान अंतर्गत आदिवासी समाज सभागृह बांधणे या करिता ३५ लाखाचा निधी तर “राज्याने नागरी स्थाननक स्वराज्य संस्थांना द्यावयाच्या मोटार वाहन कराच्या अभिहस्तातिक रस्ते कामा अनुदान (अनिवार्य ) योजने अंतर्गत म्हसळा नगरपंचायत करिता रक्कम रु. १,४०,०००००/- रुपयांचा विवरण पत्र देण्यात आला आहे.
या कामामध्ये शानवाज घरटकर ते इम्तियाज दळवी घरापर्यंत रस्ता बांधणे,असहल कादिरी ते फैरोज दामाद घरापर्यंत भूमिगत गटार करणे,मुख्य रस्ता ते हसन चांदळे घरा पर्यंत रस्ता तयार करणे, मेन रोड नगरपंचायत ते बायपास पर्यंत रस्ता डांबरीकरण करणे, अब्दुल रोघे ते इस्माईल हुरझुक यांच्या घरापर्यंत रस्ता व भूमिगत गटार तयार करणे,मुख्य रस्ता ते नसीर फौजदार घरा पर्यंत रस्ता तयार करणे,अखलाक रिफाई ते हसीना अपार्टमेंट पर्यंत भूमिगत रस्ता तयार करणे अशा कामांचा समावेश आहे.
म्हसळा शहराच्या विकास कमांबद्दल भरगोस निधी उपलब्ध करून दिल्या बद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कार्यसम्राट नामदार भरतशेठ गोगावले यांचे म्हसळा तालुक्यातील जेष्ठ नेते रवी लाड, बाळा म्हात्रे, तालुका प्रमुख अमित महामुणकर, माजी तालुका प्रमुख प्रसाद बोर्ले, माजी नगराध्यक्ष असहल कादिरी यांनी आभार मानले.

No comments:
Post a Comment