प्रवेशोत्सवाचे औचित्य साधून जी. प. सदस्य अभिषेक विचारे यांचे हस्ते फळसप येथे वृक्षारोपण संपन्न '.-

 


१६ जून २०२६.(वैभव कळस) 

१५ जून रोजी विद्यार्थी प्रवेशत्सवाचे औचित्य साधून फळसप ग्रामसुधारण मंडळ मुंबई, सोमजाई जाखमाता सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट तसेच ग्रामपंचायत फळसप यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील प्रवेशपात्र विद्यार्थ्यांचे गुलाबफुल देऊन जी. प. सदस्य अभिषेक विचारे यांचे हस्ते स्वागत करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वह्या, दफ्तर व विविध अत्यावश्यक वस्तूंचे वाटप करून निराधार आणि गरजू ग्रामस्थांना धान्य व छत्रींचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 

या निमित्ताने कै. भास्कर (दाजी) विचारे यांचा समाजसेवेचा वसा अभिषेक विचारे यांनी जपण्याचा प्रयत्न केला. दाजींचे हे समाजसेवेचे व्रत यापुढेही असेच सुरू ठेवण्याचा विश्वास अभिषेक विचारे यांनी व्यक्त केला.यावेळी भास्करजी (बापू ) विचारे, मुंबई अध्यक्ष अजित विचारे, सरपंच सुधीर साळवी, कार्याध्यक्ष मंदिर समिती रुपेश विचारे मुंबई, स्थानिक कमिटी पदाधिकारी, मंदिर समिती सदस्य,ग्रामपंचायत सदस्य , ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment