आदिनाथ कारखाना सभासदांना चिखल फेक ऐकण्यात रस नसून भोंग्याचा आवाज ऐकण्याची उत्सुकता असल्याचे मत नेरले ग्रा.पं मा.सरपंच श्रीमंत-औदुंबरराजे भोसले यांनी व्यक्त केले.
करमाळा प्रतिनिधी - जितेंद्र चांदगुडे
आदिनाथ सहकारी साखर कारखाना महाराष्ट्रातील एकमेव कारखाना ऊस क्षेत्र नजीक आहे.उजनी जलाशयामुळे पाण्याची कमतरता नाही.स.म.शंकराव मोहिते पाटील यांनी मा.आमदार रावसाहेब पाटील,स्व.बॉबीराजे भोसले, गिरधरदास देवी, विनायकराव घाडगे, गोविंद बापू पाटील, गुरुलिंगबाप्पा जाधव पाटील, मधुकरराव नीळ,झानपुरे आप्पा या तत्कालीन नेते मंडळी च्या साथीने उभा केला.परंतु कारखाना संथ गतीने चालत होता.स्व.दिगंबररावजी बागलमामा आमदार झाल्यानंतर त्यांनी या कारखान्याचा विस्तार करून,उत्कृष्ट इमारत उभी करून उत्कृष्ट नियोजनबद्ध प्रशासन निर्माण करून सभासदांच्या विश्वासात पात्र असा कारखाना चालवला.महाराष्ट्र शासनाचा प्रथम क्रमांक मिळवला.तोच कारखाना आता शेवटच्या घटका मोजताना आपण पाहत आहोत.कारखाना बंद असल्यामुळे कामगारांची कुटुंबे उघड्यावर पडले आहेत.शेतकरी सभासद हा उदासीन दिशाहीन झाला आहे.कारखाना हा प्रत्येक नागरिकांना आपला वाटत होता.ऊस घालवण्यासाठी चेअरमनच्या दारात जाऊन उंबरे जिजवावे लागत आहेत.येऊ नको म्हटले तरी कोणत्या गाडीत बसू अशी अवस्था तालुक्यातील सभासदांची झाली ही मोठी शोकांतिका आहे.
सत्ताधारी मंडळाने मोठ्या हौसेने निवडणूक लढवली मोठ मोठी आश्वासने दिली सोन्याच्या धुराचे स्वप्न दाखवले.आपण सर्व मतदाराने सुरू होईल या अपेक्षेने मतदान केले.तालुक्यात अनेक प्रश्न आहेत.जातेगाव टेंभुर्णी रस्तासह,अनेक रस्ते, करमाळा शहरातील सर्वोच्च ठिकाण असणारे तहसील व कोर्ट जाण्यासाठी रस्ता नाही. तालुकासाठी गंभीर बाब आहे.पिण्याच्या पाणी,शेतीच्या पाणी,भ्रष्टाचारी प्रशासन यंत्रणा,दुष्काळी परिस्थिती असे अनेक प्रश्न असताना केले.या *प्रश्नाबाबतचा विकासाचा व कारखाना सुरू करण्याचा नियोजन आराखडा नागरिकासमोर देण्याऐवजी कारखान्याबाबतीची फक्त चिखल फेक ऐकायला मिळत आहे.* कारखाना बंद,कारखान्याचे काय काय झाले हे सर्व तालुक्यातील सुज्ञ नागरिकांना/सभासदांना माहिती आहे.मागील काळात कारखाना संदर्भात अनेक आंदोलन उभे राहिली तशा प्रकारचे आंदोलन आता कारखाना सुरू होण्यासाठी उभे राहणे गरजेचे आहे.तालुक्याच्या प्रगतीसाठी कारखाना सुरू राहणे अत्यंत गरजेचे आहे.बंद असल्यामुळे प्रगती थांबली आहे.कारखान्याच्या भोंग्याचा आवाज ऐकण्याची उत्सुकता सभासदांच्या मनामध्ये तीव्र आहे असे मत हिंदवी स्वराज्य ग्रुपचे संस्थापक व नेरलेचे माजी सरपंच श्रीमंत-औदुंबरराजे भोसले यांनी व्यक्त केले.

No comments:
Post a Comment