साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती खरडगावात उत्साहात साजरी.
प्रतिनिधी : नामदेव सरोदे
शेवगाव तालुक्यातील खरडगाव येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती मोठ्या उत्साहात आणि सामाजिक सलोख्याच्या वातावरणात साजरी करण्यात आली.
१ ऑगस्ट रोजी प्रतिमा पूजन करून जयंती उत्सवाची सुरुवात करण्यात आली, तर २ ऑगस्ट रोजी भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. या उत्सवात गावातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सरपंच भगवानराव डावरे, प्रमुख उपस्थिती उपसरपंच आदिनाथ (बंडू) बोडखे, सामाजिक कार्यकर्ते दीपक अण्णा बोडखे, सदस्य कानिफ तेलुरे, दत्तू सरसे, भानुदास ननवरे, नेवासा पोलीस स्टेशनच्या गुप्तहेर विभागातील भारत बोडखे, शिवजयंती उत्सव समितीचे ज्ञानेश्वर खबाले व नारायण दाजी लबडे, वंचित बहुजन संघटनेचे सुरेश खंडागळे , मातंग समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमात सृष्टी सुनिल घोरपडे, रिद्धी घोरपडे आणि सिद्धी घोरपडे या लहुकन्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्यावर प्रभावी भाषणे केली. त्यांच्या उत्कृष्ट वक्तृत्वाचा गौरव करत त्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
तसेच लहुजी ग्रुपचे अध्यक्ष अमोल घोरपडे, उपाध्यक्ष राम घोरपडे तसेच लहुजी ग्रुपच्या सर्व युवा कार्यकर्त्यांनी जयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.
सामाजिक ऐक्य, समता आणि लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा जागर कार्यक्रमातून देण्यात आला. उत्सवाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.

No comments:
Post a Comment