लंघापूर पुनर्वसन येथे साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १06 वी जयंती उत्साहात साजरी

 


प्रतिनिधी गजानन चव्हाण 

लंघापूर पुनर्वसन : साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १06 व्या जयंतीनिमित्त लंघापूर पुनर्वसन येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम लहुजी छावा सेना व पंचशील युवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून महादेव क्षीरसागर, अशोकरावजी थोरात, सुनीलभाऊजी खंडारे, महादेवरावजी इंगोले, जानरावजी गवई, रूपालीताई खडसे, राजूभाऊ वरघट, शाहरुख शाह, फैजान शाह, आदित्य वरघट, अनिकेत सोनवणे, विजय करडे, राधा करडे, रूपालीताई करडे, पुष्पाबाई करडे, अनिताताई करडे व सुशिलाबाई करडे यांची उपस्थिती लाभली.

यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या विचारांना अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, सामाजिक कार्य आणि समतेच्या विचारांचा वारसा जपण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमास गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, युवक, महिला तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सहभागामुळे जयंती सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गजानन करडे, अध्यक्ष – साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लहुजी छावा सेना, तसेच पंचशील युवा मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.


No comments:

Post a Comment