प्रेरणा प्रशासकीय सेवा महाविद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा
प्रतिनिधी. अनुराग बुजाडे
गडचांदूर, दि. २१ जून : प्रेरणा प्रशासकीय सेवा महाविद्यालय, गडचांदूर येथे जागतिक योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात विद्यार्थी व उपस्थित मान्यवरांनी योगाभ्यास करून निरोगी जीवनाचा संदेश दिला.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. कुलभूषण मोरे यांनी योगाचे शारीरिक, मानसिक व बौद्धिक आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम स्पष्ट करत नियमित योगाभ्यासाचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. नामदेवराव ठेगणे होते.
यावेळी ठेगणे सर, ज्ञानेश्वर धोटे सर, बोबडे सर, डॉ. मोरे, बत्तुलवार सर, छाया गायकवाड, प्रतीक मून, रोहन धाडे, अर्चना मुत्तलवार व खुशी आत्राम यांच्यासह अनेक मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते. सर्वांनी सामूहिक योगाभ्यास करून आरोग्यदायी जीवनशैलीचा संकल्प केला.
कार्यक्रम उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.

No comments:
Post a Comment