दिलेला शब्द पाळला! खरडगावच्या सरपंचांकडून लहूजी वस्ताद ग्रुप च्या विकासकामांना वेग; सकल मातंग समाजाकडून कौतुकाचा वर्षाव..!!
प्रतिनिधी: नामदेव सरोदे
: शेवगाव तालुक्यातील खरडगाव येथील विद्यमान सरपंच भगवानराव डावरे पाटील यांनी दलित वस्तीतील अध्यक्रांती लहूजी वस्ताद ग्रुप यांना दिलेला शब्द कृतीत उतरवत प्रतिष्ठानच्या विकासकामांना गती दिली आहे. वस्ताद ग्रुप साठी फाउंडेशन, ध्वजस्तंभ, पेव्हर ब्लॉक तसेच स्वतंत्र जागेचा विकास अशी विविध कामे युद्धपातळीवर सुरू असून, परिसरात समाधानाचे वातावरण आहे.
सरपंच भगवानराव डावरे पाटील यांनी अध्यक्रांती लहूजी वस्ताद ग्रुप कार्यकारी मंडळाशी संवाद साधताना साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीपूर्वी सर्व विकासकामे पूर्णत्वास नेण्याचा ठाम विश्वास व्यक्त केला. या आश्वासनामुळे प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि समाजबांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या विकासकामांमुळे दलित वस्तीतील सामाजिक, सांस्कृतिक आणि सार्वजनिक उपक्रमांना नवी दिशा मिळणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे, दिलेला शब्द पाळून प्रत्यक्ष कामांना सुरुवात केल्यामुळे सकल मातंग समाजाकडून सरपंच भगवानराव डावरे पाटील यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून, लहूजी वस्ताद ग्रुपचे कार्यकारी मंडळासह समाजबांधवांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
खरडगावातील हा विकासाभिमुख उपक्रम सामाजिक बांधिलकीचे उदाहरण ठरत असून, समाजहितासाठी अशाच लोकाभिमुख कामांची परंपरा पुढेही कायम राहील, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

No comments:
Post a Comment