कौलखेड जहागीर येथे साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती उत्साहात साजरी.
प्रतिनिधी गजानन चव्हाण
कौलखेड जहागीर, दि. २ ऑगस्ट २०२६ : कौलखेड जहागीर येथे साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती मोठ्या उत्साहात व समाजबांधवांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावाचे सरपंच शैलेश तायडे हे होते. प्रमुख उपस्थिती म्हणून अरविंद तायडे (उपसरपंच), अनिल विठ्ठलराव तायडे, गंगाधरभाऊ तायडे, भूषणभाऊ तायडे, निलेशभाऊ तायडे, सदानंदभाऊ वाकोडे, दिलीपभाऊ बास्कर, सचिनभाऊ तायडे, आशिष महेश तायडे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते शिवश्री अभयदादा तायडे यांनी डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याचा, साहित्याचा व सामाजिक योगदानाचा आढावा घेत उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा समाजाने अंगीकार करून सामाजिक एकात्मता व शिक्षणाचा प्रसार करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अवधूत सोनवणे यांनी केले, तर पुरुषोत्तम वाघमारे यांनी आभार प्रदर्शन केले.यावेळी गजानन इंगळे, शहाजीराव तायडे, प्रकाश वाघमारे, श्रीकृष्ण सोनवणे, अर्जुन तायडे, लखन शहाजीराव तायडे, विठ्ठल वाघमारे, संतोष खंडारे, दादाराव दुतोंडे, रामकृष्ण सोनवणे, शंकर तायडे, रवी इंगळे, संदीपभाऊ झोंबाडे, प्रतिफुल झोंबाडे, कमल गवई, गौतम शिरसाट, शनी सुबेकार, शुभम सुबेकार, निखिल तायडे, शरद आमटे, गोपाल गणगावकर, राजाराम बाणगावकर, अशोक घनगावकर, आनंद विनोद तायडे, किरण ढवळे, दादाराव वारके तसेच समस्त समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. उपस्थितांनी साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

No comments:
Post a Comment