पत्रकारांना धमकी म्हणजे लोकशाहीला आव्हानः दोषींना कोणतीही माफी नाही = मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस



 दर्पण जिल्हा प्रतिनिधी संतोष ठाकरे

राज्यातील पत्रकारांना धमकावणे, मारहाण करणे अथवा त्यांच्या कामात अडथळा निर्माण करणे यासारख्या घटनांकडे राज्य' सरकार अत्यंत गंभीरयांने पाहत असून अशा प्रवृत्तीच्या व्यक्तींना थेट तृरुंगाची हवा खावी लागेल,. असा कडक इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की, लोकशाही व्यवस्थेत पत्रकार आणि माध्यमे हे चौथे स्तंभ असून समाजातील विविध प्रश्न. जनतेच्या समस्या आणि शासनाच्या योजनांची माहिती नागरिकांपर्यत पोहोचविण्याचे महत्वपूर्ण कार्य ते करतात, त्यामुळे पत्रकारांवर होणारे हल्ले. धमक्या किंवा दबाव टाकण्यांचे प्रकार हे केवळ व्यक्तीवरचे हल्ले नसून लोकशाही व्यवस्थेवरील थेट आघात आहेत,

पत्रकारांना निर्भयपणे काम करता यावे. त्यांना आवश्यक ' संरक्षण मिळावे आणि अशा घटनांतील दोषींवत तातडीने कठोर कारवाई व्हावी यासाठी राज्य कटिबद्ध असल्याचेत्यांनी स्यष्ट केले सरकार पत्रकारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना राबविण्यात येतील तसेच कोणत्याही राजकीय अथवा सामाजिक दबावाला बळी न  पडता दोषींविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले

पत्रकार संघटना आणि माध्यम प्रतिनिधींनी मुख्यमंत्रांच्या या भूमिकेचे स्वागत करत पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे.

पत्रकारांना धमकी देणे म्हणजे लोकशाहील आव्हान देणे होय. अशा कत्यांमध्ये सहभागी असलेल्या कोणालाही माफी दिली जाणार नाही माध्यमांचे स्वातंतर्य अबाधित ठेवणे ही सरकारची जबाबदारी असून पत्रकारांच्या सुरक्षेसाठी शासन कटिबद्ध आहे

   मुख्यमंतराचे ठोस निर्देश

- पत्रकारांना धमकावणान्यांवर कठोर कारवाई करावी

- संबधित आरोपींविरुद्ध तातडीने गुन्हे दाखल करून अटक करावी

- प्रकरणांची द्रतगतीने सुनावणी होण्यासाठी आवश्यक कार्यवाती करावी

-  पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी.

- पत्रकारांच्या सुरक्षेसाठी विशेष यंत्रणा उभारावी

- देवेंद्र फडणवीस,  मुख्यमंत्री

No comments:

Post a Comment