धोम पाटबंधारे विभागाच्या जागेवर अतिक्रमण करून बांधलेला सफेद बंगला तात्काळ जमीन दोस्त करा
अन्यथा आक्रमक पवित्रा घेऊ - पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे उपविभागीय अधिकारी धोम पाटबंधारे विभाग व वाई प्रांताधिकारी यांना निवेदन
वाई प्रतिनिधी नित्यानंद मोरे
दिनांक 17 जून रोजी पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे उपविभागीय अधिकारी धोम पाटबंधारे विभाग व प्रांताधिकारी वाई यांची भेट घेण्यात आली. सर्वे नंबर 158/1 , मिथिला नगर वाई येथे धोम पाटबंधारे विभागाच्या असलेला जागेवर अतिक्रमण करून बेकायदेशीर असा सफेद बंगला उभा करण्यात आला आहे. पीपल्स रिपब्लिकन पार्टीने दिलेल्या माहितीनुसार सदर बंगला हा एका नामांकित शासकीय अधिकाऱ्याने अतिक्रमण करून बांधला आहे. अतिक्रमण करणे व अनधिकृत बांधकाम करणे हा फौजदारी गुन्हा असल्या कारणे ,सदर बंगल्यावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा. त्याचप्रमाणे धोम पाटबंधारे विभागाची जागा अतिक्रमण मुक्त करण्यात यावी. आपल्या पदाचा गैरवापर करून असे अतिक्रमण करणाऱ्या अधिकाऱ्याला देखील स्वतःच्या पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी शासन करण्यात यावे, अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने निवेदन देऊन अधिकाऱ्यांना करण्यात आली.
सदर विषयावर तात्काळ गंभीर दखल घेऊन कोणतीही परिपूर्ण कारवाई न दिसल्यास पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. खासदार , आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे सर तथा राष्ट्रीय कार्याध्यक्ष महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे उपाध्यक्ष ,राज्यमंत्री जयदीप भाई कवाडे यांच्या दिशा निर्देशानुसार ,सातारा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष युवराज कांबळे ,युवक जिल्हाध्यक्ष अनमोल कांबळे यांच्या उपस्थितीत बेमुदत आंदोलन करण्यात येईल व उद्भवणाऱ्या सर्व परिस्थितीस त्यावेळी प्रशासन जबाबदार ठरेल असा इशारा पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सातारा जिल्हा महासचिव प्रणित मोरे यांनी प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला आहे. सदर निवेदन देताना पीपल्स रिपब्लिकन पार्टी प्रणित राष्ट्रीय मजदूर सेनेचे सातारा जिल्हा संघटक विकास दादा जाधव ,वाई तालुका अध्यक्ष विजय भाऊ सातपुते, वाई तालुका युवक कार्याध्यक्ष आकाश गायकवाड, युवक तालुका उपाध्यक्ष रोहित कवळे, युवक तालुका महासचिव सलमान पटेल, शहराध्यक्ष वाई रणवीर परदेशी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment