महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत झालेल्या कामांचे सामाजिक अंकेक्षण संपन्न
माहुली येथे सामाजिक अंकेशन संबंधित विशेष ग्रामसभा उत्साहात
मानोरा प्रतिनिधी :-
महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेशन व पारदर्शकता सोसायटी मुंबई यांच्या अंतर्गत राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मधिल झालेल्या कामाचे सामाजिक अंकेशन करीत आहे.मानोरा तालुकायातील ग्रामपंचायत मधील सर्वच ग्रामपंचायत मध्ये प्रशांत दामले जिल्हा साधन व्यक्ती यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत सन 2025-26 मध्ये झालेल्या कामांचे सामाजिक अंकेक्षण करण्यात येत आहे. माहुली येथे दि. 9 जून पासून ते 15 जून 2026 गावात रोजगार हमी योजनेत झालेल्या कामांचे सामाजिक अंकेक्षण करण्यात आले.
आणि दि. 16 जून रोजी विशेष ग्रामसभा घेण्यात आली.सामाजिक लेखा परीक्षण महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत प्रत्येक गावात सामाजिक लेखापरीक्षण अनिवार्य केले गेले आहे.माहुली या गावात सामाजिक अंकेशन करण्यासाठी भूषण प्रभुणे,जयेश सोनुले साधन व्यक्ती आले होते. यामध्ये रोजगार हमी योजने अंतर्गत विहीर, फळबाग, घरकुल यांचे फाईल आणि हजेरीपत्रक दस्ताऐवज यांची तपासणी करण्यात आली. गावातील प्रत्येक घरोघरी जाऊन मजुरासोबत प्रत्यक्ष चर्चा करण्यात आली.शेत शिवारात जाऊन शेतकरी लाभार्थी यांच्या विहीर मोजमाप करून प्रत्यक्ष कामाला भेटी देण्यात आली आहे.ग्रामपंचायतींमध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध विकासकामांचे ऑडिट करून ग्रामसभेत अहवाल सादर केला गेला आहे.सामाजिक लेखापरीक्षण यामध्ये कामाची माहिती करणे संबंधित योजनेवर किती खर्च झाला आणि काय काम झाले याची कागदपत्रे तपासणी करण्यात आली आहे.आणि दि. 16 जुन रोजी ग्रामसभा घेण्यात आली सदर ग्रामसभेत साधन व्यक्ती जयेश सोनुले, भूषण प्रभुणे यांनी रोजगार हमी योजनेचे कामाविषयीं, आणि सामाजिक अंकेशन संदर्भात 2025-2026 झालेल्या कामाचे अहवाल नागरिकांना ग्रामसभेत वाचून माहिती देण्यात आली. या ग्रामसभेचे वेळेस अध्यक्ष म्हणून जॉबकार्ड धारक मजुर अमोल पवार होते. आणि यावेळी ग्रामपंचायत सरपंच पूजा पवार,ग्रामसेवक संतोष चव्हाण, ग्राम रोजगार सहाय्यक पंडित राठोड, ग्रामपंचायत सदस्य गोपाल राठोड, चंद्रशेखर काजळे, चंद्रकला धोपटे, वंदना आडे, ग्रामपंचायत कर्मचारी बाला निगोट, अक्षय राठोड आणि गावातील शेकडो नागरिक आणि महिला बहूसंख्येने ग्रामसभेला उपस्तिथ होते.

No comments:
Post a Comment