प्री-स्कूल शिक्षण हा शिक्षणाचा भक्कम पाया : शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर पुणे
भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडी, पुणे यांच्या वतीने प्री-स्कूल शिक्षण विभागासाठी विशेष चर्चासत्र तसेच शिक्षण संस्थांच्या सन्मानाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणेने आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रशम कोल्हे यांनी केले. यावेळी बोलताना महाराष्ट्राचे शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले की, "राष्ट्राचा विकास हा त्या देशातील शिक्षण व्यवस्थेवर अवलंबून असतो. शिक्षणाचा भक्कम पाया म्हणजे प्री-स्कूल शिक्षण होय. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी दर्जेदार प्री-स्कूल शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. या क्षेत्रातील गुणवत्तावाढीसाठी शासनाचे सहकार्य कायम राहील."राज्यसभा खासदार तथा 'संसदरत्न' पुरस्कार विजेत्या मेधाताई कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, "राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये प्री-स्कूल शिक्षणावर विशेष भर देण्यात आला आहे. बदलत्या शैक्षणिक गरजा, आगामी आव्हाने आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा होणे काळाची गरज आहे. अशा चर्चासत्रांमुळे प्री-स्कूल शिक्षणाचा पाया अधिक मजबूत होण्यास मदत होईल." त्यांनी भाजपा शिक्षक आघाडी, पुणे शहर यांच्या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.हे चर्चासत्र शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या अध्यक्षतेखाली आणि राज्यसभा खासदार मेधाताई कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
यावेळी प्री-स्कूल आणि प्राथमिक शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध शिक्षण संस्थांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये माउंट एव्हरेस्ट स्कूल (आंबेगाव बुद्रुक), गॅलेक्सी स्कूल, क्रिएटिव्ह माइंड ई-लर्निंग स्कूल, सह्याद्री नर्सरी स्कूल, गुरुकुल पब्लिक स्कूल, रॉयल अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल, नेस्टलिंग मॉन्टेसरी स्कूल (ताथवडे), तेजस्विनी प्री-स्कूल, गोल्डन व्हॅली पब्लिक स्कूल (नऱ्हे), गुरुकुल प्रायमरी स्कूल (लवळे), सरस्वती प्रायमरी स्कूल (पिरंगुट), द सनशाईन एज्युकेशन इन्स्टिट्यूट (खराडी), किलबिल इंग्लिश मीडियम स्कूल (सासवड), वेदास इंटरनॅशनल प्री-स्कूल (संतनगर), जीनियस किड्स स्कूल (खराडी-चंदननगर-मांजरी), रेनबो चॅम्प्स प्री-स्कूल, विद्याधन मॉन्टेसरी प्री-स्कूल (लोणीकंद), जीनियस चॅम्प्स प्री-स्कूल तसेच पुणे केंब्रिज प्री-स्कूल (नांदेड सिटी शाखा) युगश्री पी प्रायमरी स्कूल Daffodil इंग्लिश मीडियम स्कूल यांचा समावेश होता.
कार्यक्रमाला शिक्षण सचिव सचिंद्र प्रतापसिंह, प्राथमिक शिक्षण संचालक डॉ. शरद गोसावी, उपसंचालक डॉ. गणपत मोरे, भाजपा पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, शिक्षक आघाडी प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुशांत शिंदे, प्राचार्य बबनराव उकिर्डे, पुणे विभागाध्यक्ष प्रा. नारायण राजुरवार, पुणे शहराध्यक्ष प्रा. सुनील मोरे यांसह शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य बबनराव उकिर्डे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. नारायण राजुरवार यांनी केले. या चर्चासत्रामुळे प्री-स्कूल शिक्षणाच्या गुणवत्तावाढीसाठी नवी विचार आणि दिशा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
विशेष बाब म्हणजे आंबेगाव बुद्रुक येथील Mount Everest School ला या प्रतिष्ठित सन्मानाने गौरविण्यात आले असून संस्थेचे संचालक डॉ. सुशांत शिंदे यांचे शिक्षण क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे.

No comments:
Post a Comment