माऊंट एव्हरेस्ट स्कूलला राज्यस्तरीय उत्कृष्ट प्री-स्कूल सन्मान
पुणे : शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असलेल्या माऊंट एव्हरेस्ट School ला राज्यस्तरीय "उत्कृष्ट प्री-स्कूल" पुरस्काराने गौरविण्यात आले. हा मानाचा सन्मान महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री मा. डॉ. पंकजजी भोयर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या भव्य सन्मान सोहळ्यास मा. धीरजजी घाटे (शहराध्यक्ष, भाजपा पुणे), डॉ. सचिन प्रताप सिंह (शिक्षण आयुक्त, महाराष्ट्र राज्य), मा. शरद गोसावी (शिक्षण संचालक, प्राथमिक शिक्षण, महाराष्ट्र राज्य), डॉ. गणपत मोरे (शिक्षण उपसंचालक, पुणे विभाग), प्रा. डॉ.प्रशम कोल्हे (प्रदेशाध्यक्ष, शिक्षक आघाडी), प्राचार्य बबनराव उकिरडे (प्रदेश उपाध्यक्ष, शिक्षक आघाडी), प्रा. डॉ. नारायण राजुरवार (अध्यक्ष, शिक्षक आघाडी पश्चिम महाराष्ट्र), प्रा. सुनील मोरे (अध्यक्ष, शिक्षक आघाडी पुणे शहर) तसेच प्रा. विलास बांदल (अध्यक्ष, शिक्षक आघाडी पुणे जिल्हा) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
विद्यालयाचे संस्थापक व संचालक डॉ. सुशांत शिंदे, अध्यक्ष प्री-स्कूल असोसिएशन व भाजपा शिक्षक आघाडी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी त्यांनी हा सन्मान विद्यालयाच्या शिक्षकवृंद, विद्यार्थी, पालक व सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमांचे फलित असल्याचे सांगितले.
माऊंट एव्हरेस्ट स्कूलने बालकेंद्रित शिक्षण, आधुनिक अध्यापन पद्धती, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, संस्कारमूल्यांची जोपासना आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून अल्पावधीतच वेगळी ओळख निर्माण केली आहे. या कार्याची दखल घेत विद्यालयाला हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
विद्यालयाच्या यशामध्ये मुख्याध्यापिका सौ. सुरेखा शिंदे तसेच शिक्षिका माधुरी डाळ, निकिता भोसले, स्वाती तिवाटणे, वृषाली तिखे, अमृता गोसावी, अश्विनी पाटोळे, अनिता पवार आणि संगीता धुमाळ यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. त्यांच्या समर्पित कार्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळाली असून विद्यालयाने गुणवत्ता आणि संस्कार यांचा उत्कृष्ट समन्वय साधला आहे.
या सन्मानाबद्दल परिसरातील पालक, विद्यार्थी, शिक्षणप्रेमी नागरिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विद्यालयाचे अभिनंदन केले असून माऊंट एव्हरेस्ट स्कूलच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments:
Post a Comment