बहादराबाद येथील जि.प.प्रा.शाळेतील प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न.
पत्रकार:-मोहन जाधव.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बहादराबाद येथे नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रारंभी शाळा प्रवेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून, पुष्पगुच्छ देऊन पहिले पाऊल घेऊन टाळ्यांच्या गजरात शाळेत स्वागत करण्यात आले.प्रभातफेरी काढून आनंददायी प्रसन्न वातावरण निर्मिती करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी नियमित शाळेत उपस्थित राहून गुणवत्तापूर्ण शिक्षण घ्यावे, असे आवाहन मुख्याध्यापक संतोष पारासूर यांनी केले. कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रविण पाचोरे उपाध्यक्ष संदीप पाचोरे, सरपंच अश्विनी पाचोरे, विक्रम पाचोरे,पालक राहुल पाचोरे,बाळासाहेब पाचोरे,अमोल पाचोरे,बाबासाहेब पाचोरे,संभाजी पाचोरे सुलोचना पाचोरे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रवेशोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांसाठी विविध स्वागतपर उपक्रम राबविण्यात आले होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देत शिक्षणाचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी उत्साह व आनंदाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केल्याबद्दल पालकांनी समाधान व्यक्त केले. श्रीमती सुनीता गुंजाळ यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

No comments:
Post a Comment